शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

वृक्षारोपण करुन लोकनेते देवेंद्र जी फडणवीस यांचा वाढदिवस संपन्न.

महा एनजीओ फेडरेशन पुणे व ISO प्रमाणित स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था मदनवाडी ( भिगवण‌‌‌ ) ता.इंदापुर यांच्या संयुक्त विद्यमाने मदनवाडी परिसरात‌ २२ जुलै २०२४ रोजी वृक्षारोपण करुन लोकनेते देवेंद्र जी फडणवीस यांचा वाढदिवस  संपन्न.
प्रतिनिधी डॉ. टिंगरे

महा एनजीओ फेडरेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक लोकनेते देवेंद्र जी फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै २०२४ रोजी साजरा करण्यात आला. या निमित्ताने महा एनजीओ फेडरेशन व ISO प्रमाणित स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन संकल्प करण्यात आला होता. महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांची प्रेरणा
मार्गदर्शन व सहयोग या उपक्रमास लाभले. मानव आणि निसर्ग यांच्यात दृढ संबंध आहेत. या निसर्गातूनच मानवाचा जन्म झाला आहे. मानव या 
निसर्गातूनच जन्माला आला, वाढला आणि इथेच विलीन सुद्धा झाला. या निसर्गातून मानवाला अनेक गोष्टी या मिळू लागल्या. म्हणून त्याचे जीवन जगणे अत्यंत सोपे झाले. तसेच झाडे ही पर्यावरणाचा एक महत्वाचा घटक आहेत. झाडांचे 
मानवाच्या जीवनात खूप महत्त्व आहे.
 जंगले आणि वने ही निसर्गाच्या उत्तम सौंदर्याचा साठा आहेत. या जंगलांमधून पोसणारे निसर्गाचे स्वरूप हे मानवाला प्रेरित करते. जर या धरतीवर वन किंवा जंगल नसतील तर मानवाला आपले जीवन जगणे कठीण झाले असते. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' अशा ओळींच्या माध्यमातुन संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्त्व समाजाला समजावुन सांगितले आहे. महा एनजीओ फेडरेशन संतांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन सतत समाजाच्या सेवेत कार्य करीत असते.
लोकनेते देवेंद्र जी फडणवीस यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्याचा निर्धार महा एनजीओ फेडरेशन व ISO प्रमाणित स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे मार्गदर्शक दिलीप सोट पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदनवाडी चे मुख्याध्यापक,श्री बनकर सर व सहशिक्षिक वाघ सर , कुदळे सर , गावडे सर ,संस्थेचे अध्यक्ष सुरज सोट पाटील ,  सचिव धिरज सोट पाटील , संस्थेचे कार्याध्यक्ष सोनाली चोपडे,समन्वयक शामल सोट पाटील  इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم