महाराष्ट्र पोलीस न्यूज
संपादक चांगदेव काळेल
दिनांक 15 सप्टेंबर रोजी सांगोला नियत क्षेत्रात फिरती करत असताना सांगोला ते महूद रस्त्यावर कडूलिंब लाकूड भरलेला ट्रॅक्टर विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसून आले असता, वनपरिक्षेत्राधिकारी सांगोला यांनी कारवाई केली ट्रॅक्टर जप्त करून वनपरिक्षेत्राधिकारी सांगोला कार्यालयाजवळ ठेवन्यात आला आहे
आरोपी नितीन पांडुरंग बोंडरे राहणार शिरभावी व राजू दिगंबर ओव्हाळ राहणार वाकी शिवणे यांच्यावर वन गुन्हा नोंद केला आहे, विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतूक करणार्यांवर सदरची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला तुकाराम जाधव वर यांनी केले आहे, वनपरिक्षेत्रअधिकारी मेडिकल रजेवरून हजर झाले असता लगेच कारवाईला सुरुवात करण्यात आली. अवैध वृक्ष तोड करणार्यावर्ती वनपरिक्षेत्राधिकारी जाधव वर यांच्या धडाकेबाज कारवाया पाहायला मिळत आहेत

إرسال تعليق