हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात नो एंट्री...?
प्रविणभैया माणे ,आप्पासाहेब जगदाळे ,भरत शहा हे शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार....
महाराष्ट्र पोलिस न्युज २४
महा.प्रतिनिधी / अतुल सोनकांबळे
पुणे/ इंदापूर: आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता असल्याने इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची चर्चेने जोर धरला असला तरी, पाटील यांचा संभाव्य पक्षप्रवेश कठीण असल्याचे निदर्शनास येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात असलेल्या इच्छुक उमेदवारांना डावलून पाटील यांना उमेदवारी देण्याची शक्यता कठिण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे अनेक ताकदवान उमेदवार आहेत.
लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून पंचवीस हजारांचे मताधिक्य मिळाल्याने या मतदारसंघात पवार यांची ताकद असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या मतदार संघात इंदापूर चे नगराध्यक्ष, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, अर्बन बँकेचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केलेले शहा कुटुंबातील मुकुंद शहा, भरत शहा, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा या शरद पवार गटात आहेत. सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे हेदेखील उमेदवारीच्या शर्यतीमध्ये आहेत.
पवार गटाकडे असलेले हे संभाव्य उमेदवार पाहता पाटील यांचा पक्षप्रवेश होईल आणि त्यांना उमेदवारी मिळेल, याची शक्यता कमी असल्याचे बोलले जाते.


إرسال تعليق