मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा आशीर्वाद पाठीशी ठेवून प्रत्येक गावात शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी माझे नेहमीच प्रयत्न राहतील. अण्णासाहेब काळे यांचे उद्गार
----------------------
शिंदे गट शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी आण्णासाहेब काळे यांची निवड.
----------------------------------
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
दिनांक 20
निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील अण्णासाहेब काळे यांची शिंदे गट शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली.
निवडी प्रसंगी अण्णासाहेब काळे म्हणाले की,,
मला जी पक्षाने दिलेली जबाबदारी त्या जबाबदारीचे काम पुरेपूर करीत राहीन अन्यथा कोणतेही गालबोट लागू देणार नाही.
तळागाळातील कार्यकर्ता आपला समजून इंदापूर तालुक्या मध्ये प्रत्येक गाव तिथे शिवसेनेची शाखा आपण काढणार आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व मतदार व बंधू भगिनी यांनी साथ द्यावी. लाडकी बहीण योजनाचा लाभ प्रत्येक घरोघरी आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी मिळवून दिला याचा विसर पडू देऊ नका. शिवसेना उपजिल्हाप्रमुख अण्णासाहेब काळे यांचे निवडी प्रसंगी उद्गार.
शिवसेना पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना पुणे उपजिल्हा प्रमुख या पदाची नियुक्ती करण्यात आली.
या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेशदादा पासलकर यांच्या अध्यक्षते खाली. अण्णासाहेब काळे यांची निवड करून निवडीचे पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी महिला पुणे जिल्हा प्रमुख सीमाताई कल्याणकर, इंदापूर तालुकाप्रमुख रामचंद्र जामदार, शिवसेना इंदापूर शहर प्रमुख शुभम भैय्या जामदार, विजय पवार, राजाभाऊ जानकर, धनंजय पवार, रूप चंद बापू जाधव, अशोक देवकर, विशाल धुमाळ, इत्यादी कार्यकर्ते उपस्थितीत होते .
चौकट:------
वंदनीय हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब आणि वंदनीय आनंद रावजी दिघे साहेब यांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी पुढे काम करीत राहीन
निवडी नंतर उपजिल्हाप्रमुख अण्णासाहेब काळे बोलत होते.
----------------------------



إرسال تعليق