शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पुरंदर हवेली निवडणुक 2024 साठी अतुल उर्फ अतुलराज नागरे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

 संदिप रोमण 
पुरंदर प्रतिनिधी 
       संघामधून लोकशाही संघर्ष संघटने कडुन अपक्ष उमेदवार अतुल उर्फ अतुलराज नांगरे यांनी सोमवार दि 28 ऑक्टोबर रोजी आपल्या संपुर्ण कुटुंबासह उमेदवारी अर्ज दाखल केला. 
        आपले सहकारी किरण डोईफोडे यांच्यासह दलित पॅंथर चे जिल्हाध्यक्ष जाफर मुलाणी यांच्या साथीने अतुल उर्फ अतुलराज नागरे यांनी अर्ज जमा करत असताना आपण ही लढाई लढू पण आणि नक्कीच जिंकु पण असा विश्वास व्यक्त केला.
      पुरंदर हवेली मतदारसंघातील  सर्वसामान्य जनतेचा कौल माझ्या सोबत आहे असेही त्यांनी सांगितले.
पुरंदर हवेली मतदार संघातील निवडणुक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणताही राजकीय वारसा नसताना, तसेच ना कोणताही पक्ष फक्त लोकशाही मार्गाने जनतेचा व मतदार संघाच्या विकासाचा ध्यास व शेतकऱ्यांच्या शेत मालाला हमी भाव तसेच तरुण पिढीच्या उजव्वल भविष्यासाठी हक्काचा रोजगार यासाठी मी पुरंदर हवेली मतदार संघाचा कायम ऋणी राहील असेही अतुल उर्फ अतुलराज नागरे यावेळी म्हणाले.

Post a Comment

أحدث أقدم