गजानन टिंगरे
पुणे जिल्हा संपादक
वालचंद नगर पोलीस स्टेशन अंतर्गत ३९ गावे १३ वाडया वस्त्या असा परिसर असून सदर परिसरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने त्या चोरांना आळा बसण्या करिता गावोगावी ग्राम सुरक्षा दलाची मीटिंग आयोजित करून नागरिकांना जागृत राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे
प्रत्येक गावातील नागरिकांनी अनोळखी व्यक्तीपासून सावध राहावे कोणीही संशयित व्यक्ती मिळून आल्यास ताबडतोब त्याची खात्री केल्याशिवाय त्यांना सोडून देण्यात येऊ नये किंवा त्याची विचारपूस करून खात्री करून मगच त्यांना सोडून देण्यात यावे
प्रत्येक गावामध्ये गावाच्या चारही दिशेला सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेण्यात यावे.
गावामध्ये कोणतीही गाडी किंवा अनोळखी इसम येऊ शकतात त्याची माहिती ताबडतोब ग्राम सुरक्षा दल किंवा पोलीसांशी संपर्क साधणे गावामध्ये कोणीही मोटरसायकल किंवा स्कार्पिओ जीप गाडीचा वापर करून गावामध्ये येऊन चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतात त्यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे .
गावामध्ये काही घरांना कुलूप लावलेले असतात दिवाळीचा सण असल्याने काही लोक बाहेरगावी गेलेलीअसतात अशावेळी शेजारील नागरिकांनी त्यांचे घराकडे लक्ष द्यावे गावा मध्ये कोणत्याही प्रकारचे लोकं येवू शकतात त्यासाठी आपण अनोळखी इसमांना ओळख द्यायची नाही उलट त्यांची विचारपुस करून त्यांना हाकलून लावणे अशा प्रकारे नागरीकांना मार्गदर्शन करण्यात आले
यावेळी लाकडी गावचे पोलीस पाटील परमेश्वर ढोले सरपंच भिसे प्रतिष्ठीत नागरीक काशिनाथ वणवे आणि गावातील ग्रामसुरक्षा दल मोठ्या संख्येने उपस्थित होते
إرسال تعليق