शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

साक्री पोलीसांचा विधानसभा निवडणुकीसाठी रूट मार्च; सुरक्षिततेचे आश्वासन

    संकेत बागरेचा
            धुळे जिल्हा प्रतिनिधी 
         रोजी साक्री पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धुळे जिल्हा पोलीस अधिक्षक मा. श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाप्रमाणे साक्री विधानसभा मतदारसंघात निवडणूक शांततेत पार पडावी व मतदारांनी सुरक्षितरित्या मतदानासाठी बाहेर पडावे आणी मतदान कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या उद्देशाने शहरात रूट मार्चचे आयोजन केले होते. हा रूट मार्च पोलीस स्टेशन येथून मेन रोड, बाजार पेठ मार्गे, सोनार गल्ली, बस स्टँड रोड, गोल्डी पॉइंट रस्त्यांवरून करण्यात आला.
          रूट मार्चच्या प्रारंभाला केंद्र सरकारच्या वतीने आलेले सीआरपीफचे सेकंड फोर्स चे असिस्टंट कमांडर हंसराज व त्यांच्या फोर्स च्या जवानांचे औपचारिक स्वागत झाले. नंतर उपस्थित जवानांनी मार्चला प्रारंभ केला. या मार्चमध्ये विभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे, पोलीस उप निरीक्षक विकास शेवाळे, पोलीस उप निरीक्षक संदीप संसारे, गोपनीय शाखेचे संजय शिरसाठ, उमेश चव्हाण, शांतीलाल पाटील असे एकूण १० ते १२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा  सहभाग होता तसेच सीआरपीफ चे जवानसह असे एकूण ७० ते ८० कर्मचारी सहभागी होते. या वेळी विभागीय पोलीस अधिकारी श्री संजय बांबळे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी व प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित भावनेने मतदान करावे.
        असे आवाहन करण्यात आले व तसेच लवकरच दहीवेल गावासह इतर हि काही मोठया गावांमध्ये रूट मार्च काढण्यात येणार आहे अशी माहिती प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.

Post a Comment

أحدث أقدم