पंकज सरोदे
पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे, दि. 18 : आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत असून घोडेगाव येथील बी.डी.काळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ज्ञानेश्वर वाल्हेकर, राष्ट्रीय सेवा विभाग प्रमुख सुनील नेवकर, स्वीप नोडल अधिकारी सुनिल भेके आदी उपस्थित होते.
महाविद्यालयातील सर्व नवमतदारांना मतदान करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले, तसेच सर्वांनी न चुकता मतदान करावे याबाबत नव मतदारांचे संकल्पपत्र भरून घेण्यात आले.
*संकल्पपत्र भरुन घेण्याबाबत मार्गदर्शन*
मतदारसंघात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ठाकरवाडी (चास), कोंबडवाडी(चास) येथील विद्यार्थ्यांना आपल्या आई, वडील, आजी, आजोबा, काका, काकी, दादा, ताई यांच्याकडून मतदान संकल्पपत्र भरुन घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
إرسال تعليق