रणजित दुपारगुडे
प्रतिनिधी
पुणे- म्हाळुंगे खराबवाडी गावातील खाजगी शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत शिक्षकाकडून गैरवर्तन झालेबाबत......
खराबवाडी गावातील खाजगी शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत शिक्षकाकडून गैरवर्तन करण्यात आले असून तिच्या सोबत असणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींनाही अश्लील व्हिडीओ दाखवत बळजबरी करण्याचा प्रकार समोर आला आहे.
शिक्षकाला महाळुंगे MIDC पोलिसांकडून अटक झाली असून त्याला शिक्षा देण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी अशीच घटना चाकण सारख्या सुशिक्षित शहरी भागात घडली होती. त्याचप्रमाणे खेड मध्ये पोलिस अकादमी मध्येही प्रकार घडला त्यंच्यावर हि गुन्हे दाखल करण्यात आले मात्र कोणतीही कठोर शिक्षा झाली नाही. जर असेच चालत राहिले तर भारतातील एकही मुलगी आज सुरक्षित नाही. आरोपीवर गुन्हे दाखल करून त्यांना बाहेर सोडले आहे त्यामुळे ह्या प्रवृत्तीच्या लोकांमध्ये प्रसासनाची काडीमात्र भिती राहिली नाही. जेव्हा विध्यार्थी आपल्याकडे शिकवणीला येतो त्याची तिथे सर्व जबाबदारी वडिलधारे शिक्षक यांचेवर असते.
शिक्षकच ह्या थराला जात असेल तर काय समाज घडवणार आहे हे शिक्षक आणि आश्या निवडक शिक्षकांमुळे बाकीच्या शिक्षण प्रणालीवर गालबोट लागत आहे. हे कुठतरी थांबलेच पाहिजे ह्या शिक्षकाला फाशीची शिक्षा देण्यात यावी व प्रत्येक खासगी शिकवणीत आपत्कालीन संपर्काचा तक्ता लावणे बंधनकारक करावे. खासगी शिकवणीची पोलीसस्टेशन मध्ये नोंदणी करूनच शिकवणीसाठी परवानगी देण्यात यावी. अन्यथा श्री आकाश भाऊ शांताराम डोळस जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र औद्योगिक जनरल कामगार सुरक्षा रक्षक युनियन संपर्कप्रमुख, महाराष्ट्र राज्य अखिल माथाडी आणि जनरल कामगार संघटना तालुका खेड जिल्हा पुणे अध्यक्ष तंटामुक्ती उपाध्यक्ष खरपुडी खु ।। यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण खेड तालुक्यात आंदोलन करण्यात येईल. त्याचवेळी खेड पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले ,समाज सेवक निलेश भाऊ भोसले उपस्थित होते
إرسال تعليق