गुलाब शेख
उपसंपादक
महाराष्ट्र पोलीस न्यूज २४
नांदेड - ता.मुखेड जम्मू काश्मीर मधील लेह येथे बर्फाचा डोंगर कोसल्याने वीरमर मुखेड तालुक्यातील बा -हाळी जवळील हिरानगर येथील रहिवासी असलेले व सध्या काश्मीर मधिल सियाचीन ग्लेशियरभागात कर्तव्य बजावत असतांना शहिद झालेले हवालदार सुधाकर शंकरराव राठोड यांच्या वर आज हिरानगर तांडा येथे शासकीय ईतमामात अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अँकर :- सैनिक सूधाकर शंकरराव राठोड, हे 40 वर्षाचे होते, लष्करात 127 लाईट एअर डिफेन्स रेजिमेंटमध्ये हवालदार या पदावर ते कार्यरत होते.
लडाख मधील सर्वात उंच रणभूमी व अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या सियाचीन ग्लेशियर येथील चौकी वर ते कर्तव्य बजावत होते. लेह येथे कर्तव्य बजावत असताना त्यांच्या शरीरावर बर्फाचा डोंगर कोसळला. दोन दिवस बर्फामध्येच अडकले होते. थंडी आणि बर्फाचा गंभीर परिणाम झाल्याने तातडीने चंदीगड येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास हलवण्यात आले. मात्र दुर्दैवाने मेंदूला आँक्सिजनचा पूरवठा न झाल्यामुळे सुधाकर राठोड यांना 25 नोंव्हेंबर 2024 रोजी उपचारादरम्यान वीरमरण आल.
सुधाकर राठोड यांच्या पश्चात त्यांच्या आई धोंड्याबाई शंकर राठोड, भाऊ मधुकर शंकर राठोड, पत्नी आशा सुधाकर राठोड, मुलगा ओम सुधाकर राठोड (वय 8 वर्ष), मुलगी सुधाकर राठोड (वय 6 वर्ष) असा त्यांचा मोठा परिवार असून त्याच्याबद्दल सर्व गावकरी व परिसरातील लहान थोर मंडळीनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांना मानवंदना देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा शालेय विद्यार्थी, माजी सैनिक, सामान्य जनता मोठ्या संख्येने पूष्प व्रष्टि व जयजयकार करीत होते.
शहिद सूधाकर राठोड, यांच्या पार्थिवावर शासकीय ईतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दल व पोलीस दलाकडून हवेत गोळ्या झाडत मानवंदना दिली. यावेळी 127 लाईट एअर डिफेन्स रेजिमेंटचे कर्नल प्रशांत ठाकूर, बँटरी कमांडर मेजर शिवम, स्टेशन हेडकॉटर संभाजी नगर 97 आरटी ब्रिगेड मेजर हे सर्व उपस्थित होते.
प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी अनूप पाटील, तहसीलदार राजेश जाधव,गटविकास अधिकारी सि.ऐल.रामोड,उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, स.पो.नि.भालचंद्र तिडके, पो.उप.नि.अमर केंद्रे आ.तूषार राठोड यांच्या मातोश्री चक्रावती बाई राठोड, तसेच राजे छत्रपती अकॅडमीचे संचालक तथा सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डूमणे, हे उपस्थित होते. दरम्यान जनसंमुदायाला कंट्रोल करण्यासाठी राजे छत्रपती अकॅडमीतील 300 ते 400 विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाला मदत केली
إرسال تعليق