शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

वनविभाग सांगोला मालकी क्षेत्रात मोठी कारवाई विनापरवाना वाहतूक, ट्रक कडूनिंब व चिंच लाकूड मालासह ट्रक जप्त

वनविभाग सांगोला मालकी क्षेत्रात मोठी कारवाई विनापरवाना वाहतूक, ट्रक कडूनिंब व चिंच लाकूड मालासह ट्रक जप्त



*सातारा जिल्हा संपादक चांगदेव काळेल* ✒️✒️✒️✒️✒️

सांगोला/ वनपरिक्षेत्रअधिकारी सांगोला यांनी दि, 12 /12/ 2024 रोजी11,30 वा च्या दरम्यान वनपरिक्षेत्र सांगोला मध्ये रात्रगस्त करीत असताना सांगोला ते एकतपुर रस्त्यावर वाहनांची तपासणी केली असता ट्रक क्र mh10 A 6373 यामध्ये कडुलिंब जळाऊ लाकूड 15 घनमीटर व चिंच जळाऊ लाकूड तेरा घर मीटर एकूण 28 घनमीटर विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसून आले ,व वाहन चालक मधुकर भगवान बोरगे राहणार जवळा यांच्याकडे वनविभागाचा लाकूड परवाना नसल्यामुळे सदरचा ट्रक लाकूड मालासह पंचनामा करून जप्त केला आहे, परिक्षेत्र अधिकारी सांगोला कार्यालयाजवळ ठेवला आहे, आरोपीस अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक मान्य आहे 
   मधुकर भगवान बोरगे रा. जवळा तालुका सांगोला (ट्रक वाहन चालक) यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर ट्रकमध्ये कडुलिंब जळाऊ लाकूड व चिंच जळाऊ लाकूड मौ, आंधळगाव ता,मंगळवेढा येथे मालकी क्षेत्रातून लाकूड माल भरलेला आहे, असे सांगितले लाकूड व्यापारी लक्ष्मण माळी राहणार आंधळगाव तालुका मंगळवेढा येथील आहेत, असे सांगितले सदरचा ट्रक आंधळगाव येथून इचलकरंजी येथे लाकूड विक्रीसाठी घेऊन जात असताना सांगोला हद्दीमध्ये सदरचा ट्रक दि, 12 /12 2024 रोजी रात्री 11.30 वाजता वनविभागाचा वाहतूक पास नसल्यामुळे लाकूडमालासह जप्त केला आहे , आरोपी 1)मधुकर भगवान बोरगे ट्रक चालक २)लक्ष्मण माळी आंधळगाव लाकूड व्यापारी 3)निसार शेख ट्रक मालक राहणार सांगोला या तिन्ही व्यक्तीवर वनपरिक्षेत्राधिकारी सांगोला यांचा प्रथम वनगुणना नोंद केला आहे, सदर ट्रक मधील कडुलिंब जळाऊ लाकूड व चिंच जळाऊ लाकूड अंदाजे नऊ टन होईल बाजार भाव प्रमाणे सदरच्या लाकडाची किंमत 30000 होईल, याबाबत वनक्षेत्र अधिकारी सांगोला श्री तुकाराम जाधव वर तपास करीत आहेत विनापरवाना वृक्षतोड करणे व विनापरवाना वाहतूक करणे आरोपी यांना मान्य आहे,
         वनविभाचा वृक्षतोड परवाना घेतल्यानंतर वृक्षतोड करावी व विभागाचा वाहतूक पास घेतल्यानंतरच वाहतूक करावी अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक केल्यास वनविभागाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आवाहन श्री तुकाराम जाधव वर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे, प्रत्येक व्यक्तीने झाडांचे संरक्षण करावे ज्या झाडापासून धोका आहे असे झाडे तोडण्यासाठी कार्यालयात अर्ज करावा प्रत्येक माणसाला झाडापासून एका दिवसात 15 की, ग्रॅ ऑक्सिजन लागतो ,ज्या झाडाचे गोलाई साधारण सहा ते सात फूट आहे अशी साडेसात असल्यास एका माणसाला 15 कि ग्रॅ ऑक्सिजन मिळतो असे पर्यावरण तज्ञ यांचे मत आहे झाडे आहेत म्हणून आपण आहोत ,याची जाणीव कोरोना कोविड च्या काळात आपल्याला माहीत झाले आहे ,
        त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने झाडाची संरक्षण करावे, व जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखावा वनक्षेत्रात अवैध वाहतूक व वृक्षतोड होत असल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री तुकाराम जाधव वर यांचा मोबाईल नंबर 94 20 37 82 79 वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे ,सदरची कारवाई माननीय मुख्य वनसंरक्षक (पुणे )श्री एन आर प्रवीण साहेब व उपवनसंरक्षक सोलापूर लेफ्टनंट कुशाग्र पाठक व सहाय्यक वनसंरक्षक सोलापूर व्हीएम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येईल सदरची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधववर, वनपाल जे ,जे ,खोंदे वनरक्षक महुद जगताप यांनी केली

*संपादक चांगदेव काळेल*
*8999363367*
✒️✒️✒️📰📰

Post a Comment

أحدث أقدم