शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

माणगावचे सुपुत्र आर्यन साबळे यांना इंग्लंड येथील एक्सेटर विद्यापीठातून आर्थिक तंत्रज्ञान मास्टर्स पदवी संपादन

माणगावचे सुपुत्र आर्यन साबळे यांना इंग्लंड येथील एक्सेटर विद्यापीठातून आर्थिक तंत्रज्ञान मास्टर्स पदवी संपादन
( माणगाव - उत्तम तांबे , रायगड जिल्हा संपादक ).
लोकनेते अशोक दादा साबळे पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आणि माणगाव नगर पंचायतीचे नगरसेवक तथा पाणी पुरवठा कमिटीचे सभापती प्रशांत अशोक साबळे यांचे चिरंजीव कु. आर्यन प्रशांत साबळे ह्याने इंग्लंड येथील एक्सेटर विद्यापिठातून आर्थिक तंत्रज्ञान मास्टर्स या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.

आर्यन याचे शालेय शिक्षण माणगाव येथे झाले असून त्याने माणगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयीन ११वी आणि १२ वीचे शिक्षण विज्ञान शाखेतून पुर्ण केले. तो मनमिळावू आणि शांत स्वभावाचा आहे. सध्या जगात आर्थिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. यासाठी आर्यन याने प्रचंड मेहनत घेतली आहे. इंग्लंड मधील वातावरण आणि आहार शरीराला अनुकूल नसतानाही केवळ जिद्द आणि चिकाटीने रात्रंदिवस अभ्यास करून आर्यनने मिळविलेले यश हे निश्चितच कौतुकास्पद ठरले आहे.

आर्यन हा लहानपणा पासूनच अत्यंत हुशार आहे. हे यश त्याने कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळवले आहे. अभ्यासक्रमाला प्रगतशील देशात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे. आपले आजोबा माजी आमदार स्व. अशोक दादा साबळे यांचे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्नं नातू आर्यन उर्मिला प्रशांत साबळे याने प्रत्यक्षात साकार केल्याने त्यांच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गुरूवार दि १२ डिसेंबर रोजी इंग्लंड येथे दिमाखदार पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. त्याने पदव्युत्तर पदवी संपादन केल्याबद्दल आर्यन याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेकांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم