परभणी शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील स्टोन मध्ये असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केलेल्या सर्वच व्यक्तींवर गुन्हे दाखल होऊन तत्काळ अटक होणेबाबत.
पुणे प्रतिनिधी, रणजित दुपारगुडे
मंगळवार १० डिसेंबर २०२४ रोजी परभणी शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील स्टोन मध्ये असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृती चा अवमान करत संपूर्ण भारताचा अपमान केला आहे. परभणी मध्ये झालेल्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. अश्या सोपान दत्ताराव पवार. ह्याला देशद्रोही घोषित करून फाशीची शिक्षा देण्यात आलीच पाहिजे. आश्या देशद्रोही लोकांना कोणी परवानगी दिली. ह्या घटनेत कोणाचा हात आहे.? कोणाच्या सांगण्यावरून हे सर्व प्रकार घडवले जात आहे.? हे संविधान सर्वांच आहे आणि आपल्यातलेच लोक संविधानाचा अपमान करत आहे.संविधानाचा अपमान म्हणजे देशाचा अपमान आहे आणि हे आम्ही खपवून घेणार नाही. संविधान विटंबना आजून किती वेळा होणार आहे. सरकार झोपले आहे का.? सरकार का गप्प आहे.? आज फक्त रेल्वे रोखली आहे. हे जर थांबले नाही तर एक दिवस संपूर्ण महाराष्ट्राचे दळणवळण थांबवले जाईल. हा सर्व प्रकार कोणाच्या निदर्शनाखाली घडला ? का घडला.? याची सखोल चौकशी करण्यात यावी, ह्या प्रकारामाघील मुख्य सुत्रधार कोण आहे.? या सर्वाना २४ तासाच्या आत अटक करण्यात यावी अन्यथा श्री आकाश भाऊ शांताराम डोळस जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र औद्योगिक जनरल कामगार सुरक्षा रक्षक युनियन संपर्क प्रमुख, महाराष्ट्र राज्य अखिल माथाडी आणि जनरल कामगार संघटना तालुका खेड जिल्हा पुणे अध्यक्ष तंटामुक्ती उपाध्यक्ष खरपुडी खु ।। यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल. त्याचवेळी खेड पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले मा. श्री आकाश भाऊ शांताराम डोळस जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ,महाराष्ट्र औद्योगिक जनरल कामगार सुरक्षा रक्षक युनियन संपर्कप्रमुख ,महाराष्ट्र राज्य अखिल माथाडी आणि जनरल कामगार संघटना तालुका खेड जिल्हा पुणे अध्यक्ष ,तंटामुक्ती उपाध्यक्ष खरपुडी खु ।।समाजसेवक निलेश भाऊ भोसले ,समाजसेवक नामदेव भाऊ उपस्थित होते
إرسال تعليق