शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक इंदापूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक इंदापूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी.
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार

 विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र फक्त इतिहास नसून, ते आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

डॉ. देशपांडे म्हणाले, "शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर उत्कृष्ट व्यवस्थापक, आदर्श नेता आणि दूरदृष्टी असलेले राज्यकर्ते होते. त्यांच्या चरित्रातून आपण नेतृत्वगुण, रणनीती आणि धैर्य शिकू शकतो. विद्यार्थी जीवनात शिस्त, परिश्रम आणि ध्येयधोरण अंगीकारले, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. शिवरायांच्या ध्येयवादी वृत्तीचा आणि स्वाभिमानाचा आदर्श घेतल्यास भविष्यातील आव्हानांना सामोरे जाणे सोपे होईल. त्यांच्या ‘स्वराज्य’ संकल्पनेप्रमाणे, विद्यार्थ्यांनीही ज्ञानार्जन करून स्वतःचे भवितव्य घडवावे व समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे.”
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. लक्ष्मीकांत लाकाळ यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्र वाचनाची सवय लावावी असे आवाहन केले. ते म्हणाले, "जसे शिवरायांना त्यांच्या माता जिजाऊ माँसाहेब व वडील शहाजीराजे यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच आजच्या विद्यार्थ्यांनीही आपल्या शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन घेऊन समाज आणि देशाच्या उन्नतीसाठी कार्य करावे."

याप्रसंगी महाविद्यालयाची विद्यार्थिनी रिया लोंढे हिने स्वयंस्फूर्तीने शिवरायांच्या आगमनावेळी दिली जाणारी घोषणा – गारद देऊन शिवरायांना अभिवादन केले आणि तिच्या बरोबरच सर्व उपस्थितांनी शिवरायांचा जयजयकार करत संपूर्ण वातावरण शिवमय केले.

या प्रसंगी शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विभागप्रमुख व कर्मचारी वर्गाने योगदान दिले.

Post a Comment

أحدث أقدم