इंदापूरचे गटविकास अधिकारी यांनी आपला मुलगा "मल्हार" चा वाढदिवस मतिमंद मुलांसोबत केला साजरा...
इंदापूर तालुका प्रतिनिधी शिवाजी आप्पा पवार
इंदापूर दत्तनगर येथील मतिमंद शाळा येथे आज दि. २/२/२०२५ रोजी समाजात वंचित आणि मतिमंद मुलांसाठी काहीतरी करण्याची भावना ठेवत गटविकास अधिकारी सचिन खुडे व त्यांच्या परिवाराने आपला मुलगा मल्हार सचिन खुडे याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने दत्तनगर येथील मतिमंद मुलांच्या शाळेत साजरा केला. यावेळी सचिन खुडे साहेब म्हणाले अशा पद्धतीने सर्वांनीच वाढदिवस साजरा करावा. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने सर्वांनीच असे सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरे करावेत. सामाजिक बांधिलकी तसेच या मतिमंद मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. मुलांच्या शाळेत जाऊन तिथल्या मुलांसोबत जन्मदिवस साजरा करून आनंद वाटून घेतला. खुडे कुटुंबीयांनी विद्यार्थ्यांना खाऊ आणि शालेय साहित्याचे वाटप करून शाळेतील विद्यार्थ्यांन सोबत उत्साहात मुलाचा वाढदिवस साजरा केला. शाळेतील मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सर्व खोडे कुटुंब ही भारावून गेले.
या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. देशपांडे यांनी मल्हार खुडे यास जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊन गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचे आभार मानले. आणि अशा सामाजिक कार्यातून समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे सांगितले.
यावेळी पंचायत समिती कर्मचारी मित्रमंडळी, कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या आगळ्यावेगळ्या वाढदिवसामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि उपस्थित सर्वांनीच या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.
إرسال تعليق