शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्या. श्री. शंकरराव खलाणे.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावभेठ प्रसंगी नेर येथे गांधी चौकात बैठक झाली यावेळी नेरचे माजी सरपंच व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. शंकरराव खलाणे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अनेक योजना असून जसे कांदा चाळ योजना, ठिबंक सिंचन योजना,पिक विमा योजना, रोटाव्हेटर, ट्रॅक्टर अनुदान अशा अनेक योजना असून त्या सर्व शेतकऱ्यांना पर्यंत पोहोचवल्या पाहिजे त्यांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना सुद्धा झाला पाहिजे असे याप्रसंगी सांगितले.
या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी अरविंद शिंदे यांनी शासन आपल्यासाठी असून आम्ही सर्व शेतकऱ्यांसाठी सर्व योजना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले तर कृषी पर्यवेक्षक आर. व्ही. बोरसे यांनी सर्व योजना ऑनलाईन महाडीबीटी द्वारे होत असल्याने शेतकऱ्यांनी सर्व योजनाचे ऑनलाईन अर्ज करावेत असे सांगितले. यावेळी माजी सरपंच साहेबराव सोनवणे, आर.डी. माळी, दिनेश जाधव, साहेबराव गवळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील भागवत, भगवान माने, तुळशीराम बोढरे, पिंटू भागवत, व कृषी सहाय्यक चेतन शिंदे व सतीश बोरसे सहित अनेक शेतकरी उपस्थित होते.
महाराष्ट्र पोलीस 24 न्यूज
धुळे जिल्हा प्रतिनिधी संकेत बागरेचा
إرسال تعليق