शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

शिवाजी आप्पा पवार इंदापूर तालुका प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील पोंधवडी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोंधवडी गावात राहणाऱ्या एका विवाहितेने सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून काल शुक्रवारी(दि.३१)रोजी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
भिगवण पोलिसांनी मृत विवाहितेचा पती तुषार खारतोडे , सासू मनिषा खारतोडे, सासरा धनंजय खारतोडे, दीर अवधूत खारतोडे( सर्व रा.पोंधवडी,ता- इंदापूर जिल्हा-पुणे)या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली आहे. मृत विवाहिता प्रतीक्षा तुषार खारतोडे (वय २४ वर्षे) ही बारामती तालुक्यातील सावळ गावातील असून जुलै २०२० मध्ये तिचा विवाह तुषार धनंजय खारतोडे याच्याशी झालेला होता.

लग्नानंतर सकाळी लवकर उठत नाही,काम करीत नाही तसेच पती तुषार याला घटस्फोट देण्याच्या कारणावरून सतत टोमणे मारले जात होते. सतत तिला तू मरून जा असे म्हणत होते. या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून मृत विवाहिता प्रतीक्षा खारतोडे हिने पोंधवडी गावातील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर मृत विवाहिता प्रतीक्षा हीचे वडील नवनाथ जयराम आटोळे यांनी भिगवण पोलीस ठाण्यात पती,सासू,सासरा दीर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم