रामनवमी निमित्त माणगावात भक्तिमय वातावरण;उपसंपादक N. S. रंधावा
चारिझेन फाउंडेशन आणि माणगाव सिख सेवा सोसायटीकडून २,४०० लाडू आणि पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप
दिनांक ६ मार्च रोजी रामनवमीच्या निमित्ताने माणगाव नगरीत अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. प्रभु श्रीरामांच्या पालखीच्या मिरवणुकीसाठी हजारो भक्तगणांनी उपस्थिती लावली होती. विद्युत रोशणीने नटलेले रस्ते, ढोल-ताशाच्या गजरात, भक्तिभावाने भारावलेल्या माणगावकरांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
या मंगलप्रसंगी मानगाँव सिख सेवा सोसाइटी अणि चारिझन फाउंडेशनच्या यांच्या संयुक्त विद्यमाने २,४०० लाडू आणि पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला माणगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष हर्षदा सोनडकर मॅडम, युवा नेते सुमितजी काले, आणि चारिझन फाउंडेशन उपाध्यक्ष सतीश काळे,सचिन वाघ, विलास आठवले अनिल कराड,विजयश्री कराड मॅडम,किशोर झेमसे ,कमलेश विश्वकर्मा अणि पूर्ण टीम उपस्थित होती.
मानगाँव सिख सेवा सोसाइटी अणि चारिझन फाउंडेशनच्या या निःस्वार्थ उपक्रमाबद्दल मान्यवरांनी, फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन एन एस रणधावा सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक कौतुक केले.
मानगाँव सिख सेवा सोसाइटी चे सुरिन्दर सिंह बर्मन, गुरविंदर सिंह सोढ़ी,गुरविंदर सिंह भाटिया, विरेंद्र सिंह बर्मन,अशोक सिंह, संपूर्ण टीममुळेच हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला, असे चारीझेन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन एन एस रणधावा सर यांनी सांगितले.
या सेवाभावी उपक्रमामुळे भक्तांना प्रसादाचा आनंद घेता आला आणि उन्हाच्या तापमानातही थोडा दिलासा मिळाला. सामाजिक बांधिलकी आणि सेवा भावनेचा उत्तम आदर्श या संस्थांनी उभारला आहे.
إرسال تعليق