शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

माणगाव श्रीराम नवमी उत्सव समिती तर्फे श्रीराम नवमी शोभायात्रा उत्साहात

माणगाव श्रीराम नवमी उत्सव समिती तर्फे श्रीराम नवमी शोभायात्रा उत्साहात

( माणगाव - उत्तम तांबे , रायगड जिल्हा - संपादक )
    कोकणातील सर्वात मोठी रामनवमी व माणगावकरांचा हक्काचा उत्सव म्हणजे रामनवमी ! श्रीराम नवमी उत्सव समिती माणगावच्या विद्यमाने ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमी उत्साहाचे आयोजन करण्यात आले होते . श्रीराम रक्षा स्तोत्रपठण सकाळी झाल्यानंतर अयोध्या वरून आणलेल्या श्रीरामांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला . यादरम्यान आदर्श समता नगर , साईनगर , कचेरी रोड , बालाजी कॉम्प्लेक्स ते सोनभैरव मंदिर अशी नियोजनबद्ध मोठ्या उत्साहात श्रीराम नवमी शोभायात्रा माणगाव शहरातून काढण्यात आली .
 अयोध्या श्रीराम मूर्ती दर्शन , भव्य श्रीराम मूर्ती , छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती , महाबली हनुमान वेशभूषा , समस्त वारकरी सांप्रदाय माणगाव , ढोल पथक , सीओटू ब्लास्ट , डीजे आणि लाइटिंग , फायर वर्क्स हे शोभायात्रेचे विशेष आकर्षण होते . या विशेष आकर्षणामुळे माणगाव अवघा भगवामय झाला होता . या नियोजित श्रीराम नवमी शोभायात्रा मध्ये रामभक्त व हिंदू बांधव बहुसंख्येने उपस्थित होते . सोनभैरव मंदिर खांदाड येथे महाआरती व महाप्रसाद झाल्यानंतर या भव्य - दिव्य कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Post a Comment

أحدث أقدم