पुणे - दौंड दि. 5 मार्च 2025 रोजी मधु तारा दोन दिवसाच्या श्रीगोंदा दौऱ्यावर असताना दौंड तालुका दौंड येथील शिव स्मारक समिती यांच्या सर्व पक्षीय मान्यवरांनी मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांचे त्यांच्या राज्यभरात चालत असलेल्या सेवेबद्दल फेटा बांधून त्यांचे स्वागत सत्कार केले.या वेळेस मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख यांचेही अभिनंदन करण्यात आले.
गेल्या काही दिवसापासून मधु ताराच्या संपर्कात आलेले शिव स्मारक समिती दौंड यांचे साघिव दौंड अपंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रहार संघटनेचे मा.पुणे जिल्हा उपाध्यक्ष.दौंडbतालुक्यातील सर्वांच्या परिचयाचे नाव असलेले गोर गरिबांचे कैवारी.दिव्यांगांचे आधारआदरणीय श्री रामेश्वर मंत्री साहेब यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
या प्रसंगी मधु ताराचे कार्य पाहून आपण भारावून गेलो आहोत व लवकरच दौंड तालुक्यात मधु तारा यांचा भव्य कार्यक्रम आपण घेऊन आरोग्य आणि दिव्यांगांसाठी मधु तारा सदैव उपलब्ध तालुक्यात असेल असे श्री मंत्री यांनी जाहीर केले.
या वेळी मधु तारा प्रमुख यांनी मधु ताराच्या राज्य भर चालत असलेल्या कार्याची माहिती दिली व मधु तारा नेहमीच आपल्या सोबत कायम असेल असे सांगितले.
या वेळी समितीच्या अनेक मान्यवरांनी मधु ताराच्या कार्याचे कौतुक करत शिव स्मारक* *समिती ही आज पासून मधु तारा सोबत जोडली असून नेहमीच समाजहिताचे उपक्रम मधु तारा सोबत राबवेल असे पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.
मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे यांनी या वेळी सर्वांचे आभार व्यक्त केले.
إرسال تعليق