शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

रा.गे.शिंदे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

रा.गे.शिंदे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
 
परंडा प्रतिनिधी - श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या नेतृत्व व अध्यक्षतेखाली सांस्कृतिक विभागाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे ,वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. सचिन चव्हाण प्रा.संभाजी धनवे व प्रा शंकर अंकुश यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये वाचन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले .यावेळी कार्यक्रमाचे आयोजन प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले.
   यावेळी प्रा.शंकर अंकुश यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन वाचन किती महत्त्वाचे आहे वाचनामुळे माणूस कसा घडतो या संदर्भात आपले व्याख्यान दिले तर प्रा.संभाजी धनवे यांनीही विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली .
    डॉ शहाजी चंदनशिवे यांनी आपल्या मनोगत्वातून सांगितले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक मात्र जगातील व्यक्ती आहेत ज्यांनी पुस्तकासाठी घर बांधले म्हणून बाबासाहेबांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती केली या देशाची राज्यघटना लिहिली.संविधानामुळे व बाबासाहेबांनी घेतलेल्या शिक्षणामुळे समस्त मानव जातीचे कल्याण झाले.त्यांचे विचार केवळ भारत देशाने नव्हे तर जगाने आत्मसात केले म्हणून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी  बाबासाहेबांची जयंती ही केवळ एका देशातच नव्हे तर 150 देशांमध्ये साज

Post a Comment

أحدث أقدم