शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

नदीत खेळ चाले वाळू तस्करांचा, देखाव्याचा खेळ झाला प्रशासनाचा

नदीत खेळ चाले वाळू तस्करांचा, देखाव्याचा खेळ झाला प्रशासनाचा

प्रतिनिधी सलीम शेख 
श्रीक्षेत्र माहूर तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली बदलीवर गेल्याने त्यांच्या जागी आलेले सहायक जिल्हाधिकारी झेनिथचंद्रा दोनथुला पूर्णतः रूळले नसल्याचा व तहसीलदार किशोर यादव हे खाजगी कारणास्तव रजेवर असल्याचा फायदा घेऊन वाळू तस्करांनी पैनगंगानदी पात्रातील नेर, पडसा, सायफळ आदी घाटातून शेकडो मजुराच्या व विना नंबरच्या मोठ्या जेसीबी मशीनच्या सहाय्याने दिवसरात्र अवैधरित्या वाळू उपसा करून जागोजाग त्याची मोठ मोठी ढिगारं उभी केल्याचे छायाचित्र व चलचित्र पत्रकारांच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

गोपाळ खापर्डे यांचे नेतृत्वातील पत्रकारांची चमू पाहणी करतेय हे लक्षात येताच महसूल प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून घाई गडबडीत पूर्वीच करून ठेवलेला ४२ ब्रास वाळूचा पंचनामा बाहेर आला तर जागोजाग खंदकाचे नावे अर्ध्या फुटाची नाली खोदल्याचे चित्र सुद्धा पुढे आले.

पैनगंगानदी पात्रातील नेर, टाकळी, सायफळ आदी वाळू घाटातून वाळू तस्कर दिवसरात्र
वाळू माफीया चे नाव रमा मुंडे मारोती चोले विनायक मुसळे राहुल मुसळे सुनिल घाळवट लशीमन घुले पांडु घुले वाळूचे उत्खनन करून त्याची चढ्या दराने विक्री करत आहेत, असा सुगावा माहूर शहर व परिसरातील पत्रकारांना लागला. त्यांच्या चमुने दि. ४ एप्रिल रोजी सदरील वाळू घाटांना भेट दिली. आपल्याला पाहताच टाकळी वाळू घाटातून सुमारे ५० ते ६० मजुराने धुम ठोकल्याचेही पत्रकारांच्या निदर्शनास आले. पडसा घाटावर तर विना नंबरची एक मोठी जेसीबी मशीन आडोशाला उभी केल्याचेही त्यांना दिसून आले. त्याचे चित्र व चलचित्र त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. पत्रकारांची चमू पाहणी करतेय, आता आपले पितळ उघडं पडणार म्हणून महसूल प्रशासनाने किरकोळ ब्रासचा पंचनामा केल्याने व खंदकाचे नावे अर्ध्या फुटाची मोरी खोदल्याने त्यांचा खेळ उजागर झाल्याची प्रचिती येते.

Post a Comment

أحدث أقدم