रा.गे.शिंदे महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.वर्षा खरात हिचे आकस्मित निधन
भाषण करत असताना चक्कर येऊन व्यासपीठावर कोसळली व निधन झाले
हारून शेख -प्रतिनिधी -धाराशिव येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा जिल्हा धाराशिव येथील बीएससी तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु.वर्षा
खरात ( वय 20) ही महाविद्यालयात आयोजित केलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमात मनोगत व्यक्त करत होती.निरोप समारंभाचा क्षण असल्याने सर्व विद्यार्थ्यांसमोर ती स्वतःचे मनोगत व्यक्त करत सर्वांना हासवत होती.दोन-तीन मिनिटे बोलता बोलता अचानक तिला चक्कर आल्यासारखे झाले व ती खाली कोसळली.तिला तातडीने महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी तिला उचलून उपजिल्हा रुग्णालय परांडा येथे नेण्यात आले.त्या ठिकाणी डॉक्टरांनी तीची तपासणी केली व तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.कुलकर्णी यांनी तिला मृत घोषित केले. कु.वर्षा खरात ही तिच्या वर्गात सर्वात टॉपर होती हुशार होती मनमिळाव होती तिच्या मैत्रिणीबरोबर सतत आनंदात राहायची.तिचे खूप मोठे स्वप्न होते परंतु अचानक ती या जगाचा निरोप घेऊन गेली.तिच्या जाण्याने परंडा तालुक्यातून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.तिला महाविद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने , कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे व महाविद्यालयातील सर्वच विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
إرسال تعليق