सौ. एस. सी.म्हात्रे मॅडम यांनी आपल्या सेवेची सुरुवात
प्रतिनिधी संजय गायकवाड: कै. पू. न.गोडसे विद्यामंदिर वरसई येथे पेण एज्युकेशन सोसायटी च्या प्रशालेत सप्टेंबर १९८५ मध्ये केली.विशेष म्हणजे जून मध्ये डी. एड.निकालानंतर दोन महिन्यात नोकरी मिळणे कमी लोकांच्या नशिबी असते ते भाग्य म्हात्रे मॅडम याना लाभले..डावरे. ते तांबडशेत तीन किलोमीटर.. आणि. वरसई फाटा ते वरसई तीन किलोमिटर असा सहा किलोमीटर रोज पायी प्रवास करत होत्या कारण त्याकाळात मोजक्या गाड्या असायच्या..अशा बिकट परिस्थितीत त्यांची सुरुवातीच्या काळात सेवा केली..त्यानंतर वडखळ जयकिसान विद्यामंदिर येथे त्यांनी सेवा केली.त्यानंतर सुमारे १७ वर्ष प्रायव्हेट हायस्कूल पेण आणि १८ वर्ष म . ना . नेने न कन्या शाळा पेण येथे प्रदीर्घ सेवा करण्याची संधी संस्थेने दिली..ही या यांच्या कामाची पोचपावती होती..विशेष म्हणजे आपली सेवानिवृत्ती पण वरसई येथे होणे हा एक योगायोग आहे.फार कमी शिक्षकांना लाभते ते त्यांना लाभले.
त्यांनी ३८ वर्ष ८ महिने एव्हडी प्रदीर्घ सेवा एका नामांकित संस्थेत केली. त्याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात संस्था प्रमुखांचे ऋण व्यक्त केले..
मुख्याध्यापक मुरूमकर सर,आणि त्यांच्या सर्व सेवकांनी त्यांच्या मनमिळाऊ स्वभाव,कामातील प्रामाणिक ,निस्वार्थी ,निगर्वी या गुणविषयी कौतुक केले.रजा शिल्लक असताना सुद्धा त्या अखेरच्या दिवसा पर्यंत शाळेत जात होत्या हे वाखाणण्याजोगे आहे.
आपली नेहमीच शाळेला आठवण राहावी म्हणून त्यांनी विद्येची देवता सरस्वती .त्यांची मूर्ती प्रशालेत भेट म्हणून दिली..संगीत हा त्यांच्या आवडीचा विषय आणि भविष्यात अखेर पर्यंत जोपासून आपले निवृत्ती नंतरचे जीवन आनंदाने सुखकर जावे यासाठी त्यांनी काही क्लास मध्ये प्रवेश घेतला आहे.
मितभाषी,मनमिळावू,कामातील प्रामाणिक पणा , वरिष्ठाविषयी आदर, विद्यार्थी प्रिय शिक्षिका असा त्यांची ओळख आहे. या प्रदीर्घ सेवेत शहरात डॉक्टर ,इंजिनिअर,मोठ्या,छोट्या कंपनीत,बँकेत उच्च पदावर आहेत काही पत्रकार त्यांचे विद्यार्थी आहेत..
या सेवा निवृत्ती प्रसंगी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते..
إرسال تعليق