शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

उजनी धरण क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी कारवाई करत वाळू तस्करांचे साहित्य केले जप्त

उजनी धरण क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी कारवाई करत वाळू तस्करांचे साहित्य केले जप्त
   इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार 
बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी उजनी धरण परिसरात वाळू चोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र डूडी व उपविभागीय अधिकारी बारामती उपविभाग वैभव नावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे इंदापूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कोकणे यांच्या नेतृत्वात महसूल पथकाने उजनी जलाशयात इंदापूर तालुक्यातील महादेव नगर येथे 25 एप्रिल रोजीच्या कारवाईत नष्ट केलेली बोट पुन्हा दुरुस्त करून वापरत असलेली बोट नष्ट केली.

सदर कारवाई करताना बोट दुरुस्त करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य ज्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर, व्यावसायिक गॅस सिलेंडर, वेल्डिंग व गॅस कटर, 80 लिटर डिजेल , सर्व प्रकारचे पाणे, स्टेनलेस स्टील अंगल जप्त करण्यात आले.
 सदर कारवाई मध्ये इंदापूर मंडळ अधिकारी श्याम झोडगे, माळवाडी मंडळ अधिकारी श्री औदुंबर शिंदे ग्राम महसूल अधिकारी , वैभव मुळे, तालुक्यातील पोलीस पाटील सुनिल राऊत, अरुण कांबळे , बाळासाहेब कडाळे व पोलीस कर्मचारी विनोद रासकर व नंदू जाधव यांनी भाग घेतला. प्रशासनाने वारंवार वाळूतस्करावर करत असलेल्या कारवाईबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم