ममता सागर महामाता महाउपासिका मिराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त एक दिवसीय महिला उपासिका शिबिर
रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड
भारतीय बौद्ध महासभा तालुका पेण च्या वतीने व श्रमण बुद्ध विहार कमेटी यांच्या सहकार्याने श्रमण बुद्ध विहार डोंगरी पेण येथे ममता सागर महामाता महाउपासिका मिराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त एक दिवसीय महिला उपासिका शिबिर व बालकांसाठी बाल संस्कार शिबिर पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आले सदर शिबिराचे मार्गदर्शक जिल्हा संघटक आयु. एम.जी.शिंदे होते. शेवटी महिला व बालकांच्या हस्ते केक कापून माता मिराताई आंबेडकर यांचा वाढदिवस मोठया आनंदात साजराकेला यावेळी पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनावणे संघटक सुरेश सोनावणे भास्कर कांबळे रमेश गायकवाड प्रदिप गायकवाड कांताताई शिंदे शशिकला गायकवाड व महिला भगिनीं मोठया संख्येने उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रमण बुद्ध विहार कमेटीचे अध्यक्ष सुनिल शिंदे यांनी केले. शेवटी सरणतंय घेऊन कार्यक्रमाचे समारोप झाले.
إرسال تعليق