रा.गे.शिंदे महाविद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर
विज्ञान विभागातून बेग रिहान सत्तार सर्वप्रथम
परंडा प्रतिनिधी हारून शेख - दि ५ मे२०२५ येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचालित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परांडा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.इयत्ता १२ वी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
महाविद्यालयातील विज्ञान विभागातून बेग रेहान सत्तार या विद्यार्थ्याने ८०.५०% मार्क्स घेऊन महाविद्यालयातून सर्वप्रथम क्रमांक पटकाविला, कला विभागातून कुमारी नम्रता नागनाथ शिंदे हिने ७९.६७% मार्क्स घेऊन प्रथम क्रमांक पटकिवला तर, वाणिज्य विभागातून कुमारी मोरे अश्विनी विजय हिने ७५% मार्क्स घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला. महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम टिकविली आहे.
महाविद्यालयाचा एकुण निकाल 80 .86 % लागला असुन विज्ञान विभागातून बेग रिहान सत्तार महाविद्यालयातुन सर्वप्रथम , चव्हाण स्वप्नील बाळकृष्ण याने ७५.८३ टक्के मार्क्स घेऊन व्दितीय क्रमांक पटकाविला तर कांबळे अनविशा कैलास हिने ७५.१७ टक्के मार्क्स घेऊन तृतीय क्रमांक पटकावला . कला विभागातून शिंदे नम्रता नागनाथ हिने ७९ .६७ टक्के मार्क्स घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला. सोनवणे साक्षी महारुद्र हिने ७६.१७ टक्के मार्क्स घेऊन व्दितीय क्रमांक पटकाविला तर नलवडे ऋतुजा लक्ष्मण हिने ६७ .८३ टक्के मार्क्स घेऊन तृतीय क्रमांक पटकावला.वाणिज्य विभागातून मोरे अश्विनी विजय या विद्यार्थीनीने ७५ टक्के मार्क्स घेऊन प्रथम क्रमांक पटकावला.गुंडगिरे सृष्टी धनाजी हिने ७०.१७ टक्के मार्क्स घेऊन व्दितीय क्रमांक पटकावला तर बस्के ज्ञानेश्वर किसन याने ६७ टक्के मार्क्स घेऊन तृतीय क्रमांक पटकावला.
एकुण विज्ञान विभागाचा निकाल ९१.५८ कला विभागाचा ६३.३० तर वाणिज्य विभागाचा ७५ .५१ टक्के लागला आहे . एकुणच महाविदयालयाचा ८० . ८६ टक्के निकाल लागला आहे .श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर अध्यक्ष सुनील शिंदे तसेच शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव, उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.किरण देशमुख महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे तसेच महाविद्यालयातील सर्व कनिष्ठ विभागाचे सहशिक्षक यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
إرسال تعليق