शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सावित्रीबाई फुले यांच्या नावापुढे साध्वी असा उल्लेख करून त्यांचा जाणीवपूर्वक आव्हान केला जात आहे.:-उत्तम कामटे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड

   गणेश कांबळे 
      उपसंपादक  महाराष्ट्र राज्य 
                  हडपसर --  पुणे. येथील बंटर स्कूल आवारातील कै. साध्वी सावित्रीबाई फुले विद्यानिकेतन क्र. ४ या शाळेस सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे हा चांगला उपक्रम आहे परंतु त्यांच्या नावापुढे साध्वी हे वापरून सावित्री माईंचा खऱ्या अर्थाने अवमान करण्याचा प्रयत्न पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेला आहे. यामुळे अनेकांच्या भावना दुखावत आहेत .व समाजावर देखील याचा वाईट परिणाम होताना पाहायला मिळत आहे.  आज पर्यंत हा विषय कोणी सांगितला नसेल त्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा यांच्यामार्फत  विजयकुमार थोरात उपायुक्त पुणे मनपा शिक्षण मंडळ यांना अर्जाद्वारे  लक्ष वेधून तेथील साध्वी हे शब्द काढून टाकावेत अशी अपेक्षा वजा विनंती आहे.  अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने  तीव्र आंदोलन आपल्या कार्यालयासमोर करावे लागेल. 
        
    याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या विभागावर असेल. असे यावेळी  संभाजी ब्रिगेड  पुणे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे यांनी सांगितले  याप्रसंगी तेजश्री पवार सचिव संतोष कराळे कोषाध्यक्ष निलेश काळे उपाध्यक्ष गौरी कांबळे 
  रेखा कामठे संघटक ॲड. अलीम पटेल  ॲड. अमोल लोंढे रामा कसबे संघटक महादेव सलगर पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم