शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

कनेक्ट पीपल वाय एस ब्ल्यू एफ आयोजित..... 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५"



.              *विशेष प्रतिनिधी*
                     पुणे 


    पुणे  --   पुणे जिल्हा पोलिस पाटील महिला आघाडी संपर्क प्रमुख सौ.निता दिपक वाघमारे (पोलिस पाटील लिंगाळी) यांना दिनांक २२ जुन २०२५ रोजी, अहिल्यानगर येथे
 "महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५" प्रदान करण्यात आला.

          दौंण्ड तालुक्यातील लिंगाळी गावच्या कर्तव्यदक्ष पोलिस पाटील तसेच पुणे जिल्हा पोलिस पाटील महिला आघाडी संपर्क प्रमुख सौ.निता दिपक वाघमारे  यांना अहिल्यानगर येथील कनेक्ट पिपल वाय एस ब्लु एफ या संस्थेच्या वतीने प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल.... "महाराष्ट्र भुषण पुरस्कार २०२५"या सन्मान सोहळ्यास अध्यक्ष लाभलेल्या मा.सौ.राणीताई निलेश लंके (अध्यक्ष,जिल्हा नियोजन समिती, अहिल्यानगर)
तसेच या पुरस्कार सन्मान सोहळ्याचे प्रमुख अतिथी सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) मा.श्री.संतोषजी खाडे साहेब यांचे हस्ते  "महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५" देऊन कर्तव्यदक्ष पोलिस पाटील सौ.निता दिपक वाघमारे यांना सन्मानित करण्यात आले. 
         
          यावेळी कनेक्ट पिपल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.प्रविण कांबळे साहेब , उपाध्यक्ष मा.श्री.अभिजित लोहार साहेब तसेच वर्किंग जर्नलिस्ट ऑफ इंडिया दिल्ली,सदस्य मा.श्री.जिवन धोत्रे साहेब (मॅनेजिंग डायरेक्टर) आदी मान्यवर उपस्थित होते. 
              गावगाड्यात पूर्वीपासून चालत आलेल्या पुरुषसत्ताक पद्धतीला फाटा देत आता उच्चशिक्षित तरुणी पोलिस पाटील या पदावर कार्यरत झाल्या आहेत. गावगाड्यातील 'पोलिस पाटील' हे पद अत्यंत मानाचे आणि महत्त्वाचे असे मानले जाते. पूर्वी गावातील मातब्बर, तालेवार घराणी आणि जमीनदारांच्या पिढ्यानपिढ्या या पदाचा कार्यभार चालवायच्या परंतु भारतीय राज्यघटनेने महिलांना दिलेले हक्क व अधिकार जाणून  घेत भारतीय  संविधानाला डोळ्यासमोर ठेवून सौ.निता दीपक वाघमारे एक धाडसी व्यक्तीमत्व यांनी त्यांच्या लग्नानंतर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत माध्यमिक शिक्षणा पासून उच्च शिक्षण घेऊन पोलीस पाटील या पदावर काम करत असून त्यांनी समाजापुढे एक नवा आदर्श मांडला आहे. त्यांच्या याच  कार्याची दखल घेऊन अहिल्यानगर येथील कनेक्ट पिपल वाय एस ब्लु एफ या संस्थेने "महाराष्ट्र भुषण पुरस्कार २०२५"देऊन गौरविण्यात आले आहे. 
              त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم