शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून राबविलेल्या विशेष मोहिमे दरम्यान 30 विना नंबर प्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई



.               जालिंदर आल्हाट 
                         अहिल्यानगर प्रतिनिधी 
   

            पैकी चार गाड्यांची कागदपत्रे अजून पर्यंत गाडीमालकांनी सादर केली नाही 

    राहुरी पोलीस स्टेशनचे पुढील आठवड्यात अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाईचे नियोजन

                 राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बऱ्याचशा दुचाकी गाड्या ह्या चोरांकडून अल्प दरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशन ने आज दिनांक 29/08/2025 रोजी विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती. 
सदर मोहिमेदरम्यान 30 दुचाकी वाहने विना नंबर प्लेटची आढळून आली पैकी 26 वाहन चालकांनी वाहनाचे कागदपत्र सादर करून नंबर प्लेट बसून घेतल्याने वाहनांवर 14,000 रुपये दंडात्मक कारवाई करून सदर वाहने गाडी मालकाच्या ताब्यात परत नंबर प्लेट बसवून देण्यात आली.
 *उर्वरित चार वाहनांची कागदपत्रे पोलीस स्टेशनला सादर न केल्यामुळे सदर दुचाकी वाहने राहुरी पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आलेले आहेत* . व कागदपत्रे सादर न. केल्यास त्या चोरीच्या असल्याची खात्री पटल्यावर त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
            राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपल्या दुचाकी चार चाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट बसून घ्याव्यात जेणेकरून विनाकारण दंड भरण्याची वेळ येणार नाही.. तसेच सर्व नागरिकांनी नंबर प्लेट बसवलेले असल्यास चोरीचे वाहन शोधणं सोप होईल. 

सदर मोहीम ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे  साहेब , अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विष्णू आहेर , सहायक फौजदार भाऊसाहेब आव्हाड , पोलीस हेड कॉन्स्टेबल बाप्पू साहेब फुलमाळी ,पोलीस शिपाई अमोल भांड ,आजिनाथ पाखरे, सचिन ताजणे , होमगार्ड खळेकर गौतम धोंडे महेश वरपे नितीन मोहिते अशोक सिनारे भगवान यशवंत भास्कर दीपक जाधव तुषार बोराडे अमोल झुगे चांगदेव पिलघर यांच्या पथकाने केलेली आहे.

    *राहुरी पोलीस स्टेशनचे अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाईचे नियोजन*

राहुरी पोलीस स्टेशन आधी मध्ये असे निदर्शनात आलेले आहेत की बरेचसे पालक आपल्या अल्पवयीन मुलांकडे दुचाकी वाहने देतात. त्यामुळे अल्पवयीन मुलांकडून बराच वेळी विशिष्ट वाहन चालवून अपघात होऊन प्राण्यांना मुकावे लागते. या गोष्टींच्या प्रतिबंधासाठी पुढील आठवड्यात राहुरी पोलीस स्टेशन कडून अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाईचा दंड सुमारे 25 हजार रुपये आहे. 

 तरी राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास  देऊ नये असे आव्हान करण्यात येते.

Post a Comment

أحدث أقدم