शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल, जेजुरी येथे दापोली येथील मान्यवर पाहुण्यांची सदिच्छा भेट

       संदिप रोमण 
              जेजुरी  

      श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड संचलित जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आज दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी दापोली येथील आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन सोसायटी चे मान्यवर पाहुणे सदिच्छा भेटीसाठी उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. दशरथ भोसले सर (सेक्रेटरी, आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन सोसायटी, दापोली), श्रीमती मीना कुमार रेडीज (विश्वस्त, आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन सोसायटी, दापोली), श्रीमती भक्ती रणजीत महाडिक (मुख्याध्यापिका – आर. आर. इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोली) तसेच कुमारी सुरभी गजानन बेलसे (सहशिक्षिका – आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन सोसायटी, दापोली) हे विशेष उपस्थित होते.

संस्थेच्या वतीने श्री डी. एन. गवळी सर (सहसचिव), श्री गरुड सर (बांधकाम विभाग प्रमुख) आणि श्री कानिफनाथ अमराळे सर (व्यवस्थापक) यांचीही उपस्थिती लाभली. पाहुण्यांनी शाळेची पाहणी करून शैक्षणिक उपक्रम, पायाभूत सुविधा व विद्यार्थ्यांची प्रगती यांचा आढावा घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सरिता कपूर यांनी सर्व मान्यवरांचे मन:पूर्वक स्वागत केले आणि उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم