उरण (रायगड) | उपसंपादक – संजय गायकवाड
स्पीडी मल्टीमोडस सी.एफ.एस. मधील तब्बल 450 कामगारांनी राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वाचा स्वीकार केला असून, न्यू मेरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेत एकमुखी प्रवेश केला आहे.
नवी मुंबईतील कामगारांसाठी स्वर्गीय दि. बा. पाटील साहेबांनंतर महेंद्र शेठ घरत हेच न्याय व हक्कांसाठी लढणारे एकमेव प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. याच कारणास्तव स्पीडी मल्टीमोडस सी.एफ.एस. मधील सर्व कामगारांनी त्यांच्या नेतृत्वाखाली संघटित होण्याचा निर्णय घेतला आहे.
35 वर्षांपूर्वी स्थानिकांच्या जमिनीत उभारलेली कंपनी
मे. स्पीडी मल्टीमोडस सी.एफ.एस. ही युनिट 35 वर्षांपूर्वी स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीत उभारण्यात आली होती. कंपनीतील सर्व कामगार हे प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील असून, त्यांचे रोजगार हक्काशी थेट नाते आहे.
व्यवस्थापनाची ‘फोडा आणि राज्य करा’ नीती
कामगारांमध्ये फूट पाडण्यासाठी व्यवस्थापनाने ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती अवलंबली. एकेकाळी एकसंध असलेली युनियन फोडून तब्बल सात वेगवेगळ्या युनियन स्थापन करण्यास भाग पाडले गेले. यामुळे कामगारांमध्ये मानसिक अस्वस्थता वाढली.
महेंद्र शेठ घरत यांच्याकडे विश्वासाने वाटचाल
या सगळ्याला कंटाळून आणि व्यवस्थापनाच्या अन्यायकारक वागणुकीला विरोध म्हणून, सर्व कामगारांनी एकत्र येऊन राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वाचा स्वीकार केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या न्यायासाठी ठोस भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
नामफलक अनावरण सोहळा
शुक्रवार, दि. 8 ऑगस्ट 2025 रोजी स्पीडी मल्टीमोडस सी.एफ.एस. येथे न्यू मेरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण महेंद्र शेठ घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये –
- कार्याध्यक्ष : पि. के. रमण
- सरचिटणीस : वैभव पाटील
- उपाध्यक्ष : किरीट पाटील, विनोद म्हात्रे, संजय ठाकूर, मुरलीधर ठाकूर
- सचिव : लंकेश ठाकूर, आनंद ठाकूर, आदिनाथ भोईर
- संघटक : आदित्य घरत, विवेक म्हात्रे, किरण कुंभार, अरुण म्हात्रे, राजेंद्र भगत, चंद्रकांत ठाकूर, उमेश भोईर, जितेंद्र घरत, अरुण पाटील, सुजित पाटील, हितेंद्र अलंकार पाटील, प्रशांत पाटील, संतोष म्हात्रे, अन्सारी सुभाष यादव
- महिला संघटक : कल्पना ठाकूर, रेखा घरत, निर्मला पाटील, विनया पाटील
तसेच, स्पीडी कंपनीचे कामगार प्रतिनिधी तुकाराम कडू, भानुदास तांडेल, दिनेश कडू आणि शेकडो कामगार उपस्थित होते.
कामगारांसाठी सकारात्मक बदल
महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वामुळे आज रायगड जिल्ह्यातील अनेक कामगारांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळत असून, संघटित कामगार चळवळीला नवा वेग मिळत आहे.
إرسال تعليق