संदिप रोमण
जेजुरी प्रतिनिधी
सासवड | दि. 7 ऑगस्ट 2025
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड यांनी पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करत राष्ट्रीय पातळीवर मानाचा तुरा मिळवला आहे. मंडळाच्या दोन प्राचार्यांनी दिल्ली येथे आयोजित प्रतिष्ठित National Education Conclave मध्ये दोन वेगवेगळ्या राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे.
शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, सासवड यांच्या प्राचार्या श्रीमती रेणुका सिंग मॅडम यांना Government of India, Ministry of Skill Development, N.C.E.T., N.S.D.C., Skill India – कुशल भारत तसेच 9 Plus 1 Media यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आलेल्या Principal of the Year Award for Holistic Development of Students या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाची ही राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली.
त्याचप्रमाणे, जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल, जेजुरी यांच्या प्राचार्या सौ. सरिता कपूर मॅडम यांना Innovative Teaching Practices and Excellence Award – Principal of the Year 2025 हा मानाचा पुरस्कार मिळाला. दिल्ली येथे हा सन्मान त्यांना श्री. अमित सोनी सर (Director of Admission Outreach) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिक्षण पद्धतीत केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी हा पुरस्कार देण्यात आला.
या दुहेरी यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप, सचिव माजी आमदार संजय जगताप, आय.ए.एस. अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, संस्थापक सचिव डॉ. एम. एस. जाधव, सहसचिव डी. एन. गवळी आणि व्यवस्थापक कानिफनाथ आमराळे सर यांनी दोन्ही प्राचार्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
दोन्ही माननीय प्राचार्यांच्या कार्यामुळे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे नाव थेट दिल्लीपर्यंत झळकले असून, मंडळाच्या शैक्षणिक कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.
— हार्दिक अभिनंदन 💐💐💐
إرسال تعليق