पंकज सरोदे
पुणे जिल्हा प्रतिनिधी
घोडेगाव (ता. आंबेगाव) | 27 ऑगस्ट —
गणेश चतुर्थीच्या पावन दिवशी जनता विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, घोडेगाव या शैक्षणिक संकुलात सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात शालेय गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली. सकाळी ९ वाजता गणपती बाप्पांचे शाळेमध्ये आगमन झाले. बाप्पाच्या स्वागतासाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशा आणि लेझीम पथकासह गावातून मिरवणूक काढली. "गणपती बाप्पा मोरया!" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला होता.
या उत्सवासाठी शाळेचे माजी कला शिक्षक श्री. सोमवंशी सर यांनी गणेश मूर्तीचे सौजन्याने योगदान दिले. बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संस्थेचे माननीय समन्वय समिती चेअरमन राजेश शेठ काळे यांच्या हस्ते पार पडली. या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष मा. तुकाराम शेठ काळे, सचिव मा. विश्वास राजे काळे, व खजिनदार मा. सोमनाथ शेठ काळे यांची उपस्थिती लाभली होती.
प्राणप्रतिष्ठेपूर्वीच्या पूजेचे सर्व विधी जनता विद्या मंदिरचे उपशिक्षक श्री. ऋतुपर्ण घोलप सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. त्यांनी अत्यंत श्रद्धा आणि निष्ठेने पूजा विधी पूर्ण करून वातावरणात भक्तीचा रंग भरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. कळंबे सर, उपप्राचार्य श्री. पातकर सर, पर्यवेक्षक श्री. पवार सर, तसेच जनता विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची माहिती श्री. सचिन देठे सर यांनी दिली.
जनता विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय घोडेगावमध्ये शालेय गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्ग यांच्यात नवा उत्साह निर्माण झाला असून, संपूर्ण आठवडा विविध सांस्कृतिक आणि भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
إرسال تعليق