. पंकज सरोदे
पुणे जिल्हा प्रतिनिधी
संपूर्ण जग भरात जेष्ठ नागरिक दिन २१ ऑगस्टला साजरा केला जातो. आपल्या वैयक्तिक आयुष्याचा गाडा हाकताना विस्पृतपणे कोणत्याही गोष्टीची कोणाकडून अपेक्षा न करता समाजासाठी, मुलाबाळांच्या भविष्यासाठी विशेष योगनंदनी,कृतकर्मी जेष्ठांच्या दखल घेऊन गुड सॅमेरिटन ग्रुप कडून पिंपरी, ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात सामाजिक क्षेत्रातील तमाम नेत्यांच्या हस्ते वरिष्ठांचा सत्कार करण्यात आला.
वरिष्ठांचा सत्कार करते वेळी सामाजिक कार्यकर्ता मा राजन नायर यांनी वरिष्ठांनी दाखविलेल्या रस्त्यावर आपण चाललो तर आपले भविष्य आणखी उज्वल होईल आणि त्याचबरोबर आजचे जग,आजचा भारत देश वृध्दांची काळजी घेण्यात मागे आहे,त्यांना साथ देण्यात मागे आहे आणि येणार्या काळात तरूणांनी आपल्या आईवडिलांना वयोवृद्धांचा सन्मान केला पाहिजे. आणि अशा समाजात काम करणार्या लोकांना मोठ्या प्रमाणात फक्त गुड सॅमेरिटन ग्रुप कडूनच नाही तर समाजातील इतर संस्थांकडून सत्कार केला पाहिजे. जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमीत्त तरी अशा वयोवृद्धांचा सन्मान करणे आवश्यक आहे.
या दिनाच्या शुभेच्छा देत असताना बांधकाम, व्यवसायिक आणि लायन्स क्लब अध्यक्ष श्री शिरीष हिवाळे, जेष्ठ संगीत तज्ञ किशोर हिवाळे, प्रख्यात चार्टर्ड अकांऊटंट चंद्रकांत काळे, पास्टर अजित फरांदे, पास्टर अनिश बिजाहत, पास्टर प्रविण वाघमारे, कन्संल्टंट नवीन गोरे यांनी आपल्या भाषणातून सर्वांचा सन्मान केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पास्टर बेंजमीन काळे यांनी केले आभार प्रदर्शन श्री सॅमसन चोपडे यांनी केले.
या कार्यक्रमात मा.डाॅ साधना कदम, मा.शीला वाॅकर, मा.कवी पौलस सुगंध वाघमारे, मा.अॅड अंतोन एस.कदम,मा.जयंत शरदराव साळवे, मा.पा.शिमोन इ.कन्नडी, मा.सॅम्युवल लक्ष्मण बनकर,मा पा नवनाथ सुब्राव दाखले, मा. नितीन माणिक गोर्डे, मा.पा.ज्युली प्रेमचंद सेटलानी या जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
हा जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ आयोजीत करणारे सॅमेरिटन ग्रुपचे सर्व सभासद, विशेषतः पास्टर बेंजमीन काळे, डेव्हिड काळे, सॅमसन चोपडे यांचे सामाजिक कार्यकर्ते श्री राजन नायर यांच्या कडून कौतुक करण्यात आले.
إرسال تعليق