शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

दिल्लीत उपराष्ट्रपती पदासाठी शेतकरीपुञ उमेश म्हेञे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

            धनंजय काळे 
                        महाराष्ट्र प्रतिनिधी 

नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या 2025 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून शेतकरीपुत्र आणि महाराष्ट्र लोक काँग्रेस चे संस्थापक अध्यक्ष उमेशभैय्या महादेव म्हेञे यांनी दिल्लीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दिनांक 9 ऑगस्ट रोजी उमेश म्हेञे यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला होता. आज, दिनांक 21 ऑगस्ट हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यांनी दिल्लीतील राज्यसभेतील दालनात निवडणूक निर्णय अधिकारी पी.सी. मोदी आणि गिरीमा जैन यांच्या समोर आवश्यक कागदपत्रे जोडून व १५,००० रुपयांचे डिपॉझिट भरून अर्ज दाखल केला.


यावेळी उमेश म्हेञे यांनी सांगितले की, "उपराष्ट्रपती निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणारा सर्वात कमी वयाचा मीच आहे. मी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. राजकारणात मोठ्या पक्षातील उमेदवारांना, श्रीमंतांना संधी मिळते. मग शेतकऱ्याचा मुलगा, सामान्य नागरिक का अर्ज दाखल करू नये? संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मी अर्ज भरला आहे."
त्यांनी पुढे सांगितले की, "महिनाभर पळापळ करून सर्व कागदपत्रांची जमवाजमव केली आणि आज ती सर्व कागदपत्रे जोडून अर्ज दाखल केला आहे. खासदार जसे संसद भवनाच्या पायर्‍यांवर उभे राहून छायाचित्र काढतात, तीच प्रक्रिया मीसुद्धा पूर्ण केली आहे. संपूर्ण संसद भवनाची फेरी मारून पास जमा करून बाहेर आलो."

म्हेञे यांच्या या निर्णयामुळे शेतकरीपुत्राचा आवाज संसद भवनापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न झाला असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم