महाराष्ट्र प्रतिनिधी
विशाल सूर्यवंशी यांचे लातूर तहसिल कार्यालयातील विविध आस्थापनेतील झालेल्या बोगस कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी उपोषणाला बसले आहेत.सोमवार दिनांक १५ सप्टेंबर २०२५ पासून लातूर तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे, लातूर बहुजन क्रांती मोर्चा संलग्न अखिल भारतीय आदिवासी वाल्मिक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विशाल सूर्यवंशी यांच्या वारंवार निवेदने व विविध आंदोलने करून प्रशासनाचे वेधण्यासाठी प्रयत्न करुन ही दुर्लक्ष केले गेले, यावर प्रशासन काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, मागण्या क्रमांक १ ते ८ यावर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही, तहसिल कार्यालयाच्या चारी बाजूंनी बोगस ई महाकेंद्र स्थापन झाले आहेत, याबाबत वारंवार कळवून कार्यवाही झाली नाही, महादेव कोळी अशी नोंद केलेल्या टि.सी.प्रमाणपत्राच्या आधारे कोळी समाजाच्या मुलांना आपल्या कडून किती प्रमाणपत्रे दिली गेली,
त्या लाभार्थींच्या नावाची यादी तात्काळ देण्यात यावी, लातूर तहसिल कार्यालया अंतर्गत विविध तलाठी सज्जे व मंडळ अधिकारी यांच्या कडून २०२३ ते २०२५ या वर्षात शासनाच्या तिजोरीत गोण खनिज संपत्तीचा महसूल व दंड किती गोळा झाला याची माहिती देण्यात यावी, लातूर शहरातील बोगस विट भट्टीचा काळा बाजार याप्रकरणी काय कार्यवाही केली तो अहवाल देण्यात यावा, वृध्दापकाळ निवृत्ती योजना लाभार्थींना वेळेवर देण्यात यावी,शिवभोजन केंद्राची सखोल चौकशी करून स्थापन झालेल्या केंद्राचे थकित बजेट तात्काळ वाटप करण्यात यावे, बोगस केंद्र तात्काळ बंद करण्यात यावे, संस्थेच्या शिवभोजन प्रकल्पाचा आडीट रिपोर्ट साक्षांकित पावती सह सी.ए.तपासून घ्यावा व तो रिपोर्ट संघटनेला द्यावा, गोरं गरिबांना रेशन वेळेवर देण्यात यावे, त्यांना तात्काळ रोहिंग्या मुसलमान व्यक्तींना प्रमाणपत्र वाटप करुन ते बोगस बांगलादेशी नागरिक आहेत
त्यांच्या वर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा अपमान करणार्या आधिकार्यावर कोणती कार्यवाही केली यांची माहिती द्यावी, विदेशी किरीट सोमय्या यांनी लातूर मधील काही अधिकारी यांना जेल मध्ये टाकण्याची धमकी दिली आहे,अशा व्यक्तींवर जिल्हा अधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी तहसिल यांनी कोणती कार्यवाही केली यांची माहिती देण्यात यावी, मौजे गातेगाव येथील शेतकरी जनक निवृत्ती लहाडे जमिन सर्व्हे नंबर १६०,१६१,१५८,५९,१५५ या ठिकाणचा रस्ता अडविण्यात आला तो तात्काळ चालू करावा, बरेच दिवस एकाच जागी घरोबा करून बसलेल्या तलाठी, मंडळ अधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या करण्यात याव्यात,सदर स्थावर कर्मचाऱ्यांच्या जंगम मालमत्तेत किती वाढ झाली याची चौकशी सीबीआय कडून चौकशी करून दोषींवर ३९४,४२० प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे, लातूर तालुक्यातील विविध गावात शेतबांध रस्त्याचे वाद मिटवून रस्ता तात्काळ चालू करून पक्के बनवून द्यावेत,व इतर कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई करु नये,अशा मागण्या उपोषण कर्ते विशाल सूर्यवंशी यांनी केल्या असून जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बहुजन क्रांती मोर्चा संलग्न अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेच्या वतीने उपोषण चालूच राहणार असल्याचे सांगितले.
إرسال تعليق