राहुल पडघणे
पुसद प्रतिनिधी :
दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी पुसद शहरातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये अपघातग्रस्त दोन रुग्ण दाखल झाले. त्यावेळी महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलचे प्रतिनिधी असलेले संबंधित व्यक्ती आपल्या संघटनेचे सचिव विजय स्वाल यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलच्या मागील बाजूस गेले होते. त्या वेळी अपघातग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसोबत किरकोळ वाद निर्माण झाला. मात्र, हा वाद थेट अश्लील व भ्याड शब्दांपर्यंत गेला आणि जीव घेण्याच्या धमकीपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले.
न्यूज प्रतिनिधींनी स्वतःची ओळख दाखवण्यासाठी मोबाईल आयडी सादर करताना सांगितले की, “अपघातग्रस्तांना योग्यवेळी उपचार मिळत नसल्याने मी पत्रकार म्हणून बातमी घेत आहे.” या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मेडिकलच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १२ ऑगस्ट रोजी हॉस्पिटल प्रशासनाकडे लेखी अर्ज दिला होता. मात्र, दोन दिवसांनी फुटेजसाठी बोलावूनही फुटेज देण्यात आले नाही.
त्यानंतर संबंधितांनी वसंत नगर पोलीस स्टेशन, पुसद येथे तक्रार नोंदवली. तरीसुद्धा, पोलीस प्रशासनाने आरोपीविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई केली नाही असे आरोप आहेत. सुरुवातीला रिपोर्ट घेण्यात टाळाटाळ केली गेली, अनेक वेळा पोलीस स्टेशनला चकरा माराव्या लागल्या.
दरम्यान, ३ सप्टेंबर रोजी पुसद तालुक्यातील न्यायालयाच्या पूर्वेकडील गेटसमोरही एक गंभीर घटना घडली. विटी-मुरूम वाहून नेणारा ट्रक भरधाव वेगाने माझ्यासमोरून येत होता आणि मला कट मारून पुढे निघून समोरील व्यक्तीने माझा फोटो काढून घेतला होता आणि मला धमकी दिली होती ट्रक खाली चिंधून टाकील म्हणून नांदेडच्या ड्रायव्हरला फोटो पाठवला होता माझा हा धोका मला साक्षात पाहायला मिळाला व जाणवला मी “MH04 झिरो चार” एवढाच नंबर पाहिला. मात्र, संपूर्ण घटनेचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला नाही, असा आरोप आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, पुसद तालुक्यातील ( मेडिकेअर सारखे हॉस्पिटल मध्ये घटना घडली ही आणि हॉस्पिटल हा सार्वजनिक आहे येथील कॅमेरे इतका लय दिवस बंद राहणे म्हणजे खूप मोठा काळाबाजार आहे ) हॉस्पिटल, मेडिकल, दुकाने, हॉटेल्स येथे सीसीटीव्ही असूनही पोलिसांकडून त्यातील फुटेज मिळवले जात नाही. गुन्हेगार खुलेआम फिरत असून नवे बळी शोधत आहेत, अशी भीती व्यक्त होत आहे. यामुळे सामान्य माणूस भयभीत झाला असून, गुन्हेगारीला अप्रत्यक्षरित्या पाठबळ मिळत आहे, अशी नाराजी व्यक्त होत आहे.
नागरिकांचे ठाम मत आहे की, वसंत नगर पोलीस प्रशासनाने तातडीने आरोपी शोधून कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा सामान्य नागरिकांचा कायद्यावरील विश्वास डळमळीत होईल.
👉 या सर्व घटनांमुळे पुसद तालुक्यातील नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.
إرسال تعليق