शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

फुरसुंगी महादेव मंदिरातील दान पेटी चोरी...हडपसर पोलीसांनी काही तासात चोरटे केले जेरबंद..... पोलिसांचा ग्रामस्थांकडून सत्कार.....


 पुणे, हवेली (हडपसर) : हवेली तालुक्यातील फुरसुंगी येथील महादेव मंदिरातील गाभाऱ्यातील दानपेटी चोरीस गेली. दि. २१/१०/२०२२ रोजी रात्रौ ०८/०० ते दि २२/१०/२०२२ रोजी पहाटे ०५/००  या दरम्यान शंभु महादेव मंदिर, फुरसुंगी पुणे. या मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेली दानपेटी फोडून चोरट्यांनी त्यामधील रक्कम चोरली. 
             हडपसर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी, तपास पथकातील सहप्रभारी अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार समीर पांडुळे यांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यामध्ये तीन मुले दानपेटी उचलून बाजुला घेवुन जात असताना दिसले. त्यावरुन पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ, व निखिल पवार यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, तीन्ही मुले एम.जी.रोड पुणे येथे आहेत. अशी माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी ते तिघेजण मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणण्यात आले. तपासात रेकॉर्डवरिल विधीसंघर्षग्रस्त मुलगा तसेच त्याचे इतर दोन साथीदार यांनी मिळून मंदिरामध्ये चोरी करण्यासाठी हडपसर गावठाण राम मंदिराजवळील युनिकॉर्न एम.एच.१२ जी. सी. १७२७ हि गाडी चोरुन त्या गाडीचा वापर चोरी करण्यासाठी केला. चोरी करुन झाल्यानंतर पुन्हा चोरी केलेली मोटर सायकल त्याठिकाणी पार्क केली. मंदिरात चोरी करण्यापुर्वी तीघांनी शंभु महादेव मंदिरामध्ये जावुन त्याठिकाणचे मंदिराचे सर्व परिसराचे फोटो काढून मंदिरांचे आतमध्ये जाण्यासाठी रस्ता तसेच बाहेर जाण्यासाठी रस्ता पाहिला व त्याठिकाणी कोणत्या वेळेला पुजारी येतात व भावीक येतात याचा पुर्ण अभ्यास करुन प्लॅन करुन सदर मंदिरामध्ये चोरी करण्याचे नियोजन केले. व त्यांनी मिळून मंदिरातील दानपेटी फोडली त्यामधील रक्कम हि यांना उचलता न आल्याने त्यांनी त्यामधील काहि रक्कम त्याच ठिकाणी सोडलेली होती. विशेष म्हणजे त्यांनी मिळालेली रक्कम हि लोकसेवा हनुमान मंदिर येथील जवळील गार्डन मधील कचरा टाकण्याचे डस्टबीनच्या स्टॅच्युमध्ये पोते लपवुन ठेवलेली होती. या दक्षिणा पेटीत २२, २५०/- रुपये जप्त करण्यात आलेले आहे. तिघांनी मिळून फॅशन स्ट्रीट कॅम्प पुणे येथे हौस मौज मजेसाठी व नशा करणेसाठी दानपेटीमधील रक्कम खर्च केलेली आहे. सराईत गुन्हेगार राहुलसिंग भोंड याचे फोटोचा टॅटू छातीवर / हातावर काढीत असताना तिन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेवर यापुर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ग्रामदैवताचा गुन्हा अतिशय प्राधान्याने आणि तात्काळ उघडकीस आणल्याबद्दल हडपसर तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा फुरसुंगी ग्रामस्थांनी सत्कार आयोजीत केलेला होता. ही कामगिरी नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. नम्रता पाटील पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे मागदर्शनाखाली बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे, अरविंद गोकुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांचे सुचनेनुसार तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, समीर पांडुळे, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, सुरज कुंभार व इतर तपास पथकातील अंमलदार यांचे पथकाने कामगिरी केली.

Post a Comment

Previous Post Next Post