सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे हवेली : दि.०८/०५/२०२३ रोजी कर्तव्यावर हजर असताना रात्री २२/०० वा. चे सुमारास पोना. ६५३९ प्रशांत कळसकर लोणी काळभोर पो.स्टे. पुणे यांनी धाडसी कारवाई केली.
पोलीस नाईक प्रशांत कळसकर रात्री पेट्रोलिंग करत असताना पुणे सोलापूर रोड द्राक्ष संशोधन केंद्राचे समोरील सार्वजनिक रोडवर एक संशयीत सिल्वर रंगाची ब्रिझा कार नंबर- एम.एच.१३ सी. के. २१११ ही मिळून आली कारचे डिक्कीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाल्याने,
या बाबत तात्काळ मा. पोउपआ सो. गुन्हे शाखा, पुणे शहर यांना कळवून, त्यांच्या सुचनानुसार पोना. प्रशांत कळसकर, पोउपनि लोहोटे, व स्टाफ तसेच हडपसर पो.स्टे. कडील पोशि ८६०७ सुरवसे व पोशि हंबर्डे असे सदर ठिकाणी तात्काळ उपस्थित राहिले असता त्या ठिकाणी गाडी चालक यास त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव प्रशांत गांधी असे सागितले, त्यांचेकडे त्याचे ताब्यातील गाडीमध्ये असलेल्या रक्कमेबाबत चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने व रक्कमेबाबत कोणतीही समाधानकारक माहिती देत नसल्याने व त्या ठिकाणी खुप अंधार असल्याने रात्री च्या वेळी पावसाचे वातावरण असल्याने व सुरक्षेच्या दृष्टीने संशईत इसम व त्याची कार आहे ह्या त्या स्थीतीत मोबाईल शुटींग सुरु करुन, हडपसर पोलीस स्टेशन चे समोरील कॅमेरामध्ये आणुन गाडीस पार्कीगला लावण्यात आली.
ही कारवाई युनिट-५ गुन्हे शाखा, पुणे शहर व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अरविंद गोकुळे हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे उल्हास कदम पोलीस निरीक्षक युनिट-५, गुन्हे शाखा, पुणे शहर याच्या वतीने सीआरपीसी कलम ४१ (१) (ड) प्रमाणे कारवाई करण्यात आली.
हडपसर पो.स्टे. पुणे शहर ठाणे दैनंदिनी क्र.०५/२०२३ दि.०९/०५/२०२३ अन्वये नोंद करून, पुढील कायदेशीर कार्यवाही साठी दोन पंचांना समक्ष बोलावूनया विषयी माहिती सांगून पंचासमक्ष हडपसर पो.स्टे. समोरील आवाराज हजर असलेले ब्रिजा कार चालक यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव प्रशांत धनपाल गांधी वय ४७ वर्षे, धंदा व्यापार, राहणार- मु.पो. लासुर्णे ता. इंदापूर, जि.पुणे असे असल्याचे सांगितले. त्यानंतर पंचासमक्ष हडपसर पोलीस स्टेशनचे समोरील आवारात उभ्या असलेल्या सिल्वर रंगाचे ब्रिजा कार क्र. एम. एच. १३ सी. के. २१११ चे दरवाजा उघडून सदरील गाडीमध्ये असलेल्या मोठमोठ्या विमल गुटखा नाव असलेल्या एकुण ०४ कापडी पिशव्या पंचासमक्ष बाहेर काढून दाखविल्या व सदरील पिशव्यांमध्ये ५००/- रु. १००/- रु. तसेच ५०/-रु. दराच्या नोटांचे बंडल दिसत असून, त्यासोबत रु.१०/- व २०/- रु. दराच्या काही नोटांचे बंडल दिसत आहेत. तसेच गाडीमध्ये पैसे मोजण्याचे एक इलेक्ट्रिक मशीन ही मिळून आले.
त्यामुळे सदरील नोटांचे पिशव्या, व गाडीमधील सर्व साहित्याचे पिशव्या पंचासमक्ष बाहेर काढून, ते सर्व एकत्रीत वपोनि हडपसर पो स्टे पुणे शहर यांचे कक्षात आणून, पंचासमक्ष सदरील पिशव्यांमधील रोख रक्कम बाहेर काढून, ईलेक्ट्रिक नोटा मोजनी मशीनद्वारे मोजणी केली असता, सदरील गाडीमध्ये एकुण रोख रक्कम ३,४२,६६,२२०/- रुपये (तीन कोटी, बेचाळीस लाख, सहासष्ट हजार दोनशे विस रुपये) मिळून आली
इसमाकडे त्याचे ताब्यात मिळून आलेल्या रक्कमेबाबत चौकशी करता तो काही एक समाधानकारक उत्तरे न देता उडवाडवीची उत्तरे देत असल्याने, सदरील इसमाचे ताब्यात मिळून आलेली रोख रक्कम तसेच त्याचे मोबाईल हॅण्डसेट ब्रिजा गाडी क्र.एम.एच.१३ सी.के.२१११ व रोख रक्कम मोजण्यासाठीचे ईलेक्ट्रिक मशीन व रोख रक्कम भरलेल्या पिशव्या असे सर्व मुद्देमाल सीआरपीसी कलम ४१ (१) (ड) अन्वये कारवाईसाठी पुढे देण्यात आला.
या कारवाई मुळे पोलीसांची प्रतिमा नक्कीच जनमानसात उंचावली आहे. पोलीस हे प्रामाणिक पणे कर्तव्य करत असल्याचे या कारवाई मुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
हडपसर, लोणी काळभोर परिसरात व गृहखात्यात पोलीस नाईक प्रशांत कळसकर यांच्यावर जनतेतून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र पोलीस न्युज च्या माध्यमातून गृहखात्याने या कामगिरी साठी विषेश सन्मान देऊन सन्मानित करावे..

Post a Comment