शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये जागतिक योगा दिन साजरा : प्रिन्सिपॉल झीनत सय्यद


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज 



पुणे (हडपसर) : रयत शिक्षण संस्थेच्या गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला. 

    ‌        त्या निमित्त विद्यालयातील पूर्व-प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या सर्व विद्यार्थिनींनी  शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार कवायत प्रकार, योगासन व प्राणायाम  केला.



               विद्यालयातील सर्व शिक्षकदेखील  यामध्ये सहभागी झाले होते. काही विद्यार्थिनींनी योगासन व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे महत्व सांगितले. विद्यालयातील शिक्षिका सायली झगडे यांनी योगाचे प्रशिक्षण घेऊन त्यानुसार विद्यार्थिनींना योगा दिनासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका झीनत सय्यद  यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post