शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

गावाने नाकारले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ते गावच नाकारले भिमसैनिकांनी


 अतुल सोनकांबळे

महाराष्ट्र पोलीस न्युज


👉🏻मानवतेला काळींबा फासणारी घटना. 

👉🏻बौद्ध समाजाने घेतला गाव सोडून जाण्याचा निर्णय


धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील  बौद्ध समाजाने  अखेर गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून कानेगाव येथील बंद असलेले समाज मंदिर खुले करण्यात यावी यासाठी लढा देत आहेत. समाज मंदिर बंद असल्याने गावात जयंती साजरी केली जात नाही.

         डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाकारली जाते. या नैराश्याच्या भावनेने गावातील एका बौद्ध तरुणाने (अंकुश गायकवाड) याने स्वतःचे जीवन गेल्या वर्षीच संपवले.

          गावातील समाज मंदिर जातीय मानसिकतेतून जातीय द्वेशापोटी गावातील जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी ते बंद केले आहे. ते आजतागायत समाजमंदिर खुले करण्यात आलेले नाही.

         गावात हिंदू धर्मांचे सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्यावेळी मात्र गावांमध्ये 144 कलम लागू केले जात नाही. याउलट आंबेडकरी उत्सव साजरे करायचे म्हटले की गावामध्ये 144 कलम लागू केले जाते. आणखीन किती बौद्ध तरुणांचे आपण बळी घेणार आहात? आणखीन किती बौद्ध  तरुणांचे बळी जाणार या नैराश्याच्या भावनेने या गावात न राहिलेलेच बरे अखेर गावातील बौद्ध समाजाने गाव सोडून गावाचा त्याग करून निघून जाण्याचा निर्णय घेतला असून एक तर बौद्ध समाजाचे समाज मंदिर बौद्ध समाजाच्या ताब्यात द्या त्याचप्रमाणे गावातील 144 कलम हटवून आंबेडकर जयंतीला परवानगी देण्यात यावी या मागणी करिता अखेर गावातील बौद्ध समाजाने गाव सोडले.



         आंबेडकर जयंतीचा परवाना मागण्यासाठी पोलीस प्रशासन सहकार्य करत नाही. विनंती अर्ज करून देखील परवाना नाकारण्यात आला असे बौद्ध समाजातील तरुणांनी सांगितले. पोलीस प्रशासनावर ही प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो की काय असे असले तर जनतेने न्याय कोणाला मागायचा?

       गावातील महिला लहान मुले व पुरुष या सर्वांनी असा निर्धार केला की ज्या गावांमध्ये आपल्याला माणुसकीची वागणूक मिळत नाही. ज्या गावांमध्ये आपल्याला संविधानिक अधिकारच नाहीत अशा गावात राहायचेच नाही . म्हणून १६ मार्च २०२३ रोजी जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले होते. तरीही आज तागायत या निवेदनाबाबत विचार केला गेला नाही. याच नैराश्याने ९ एप्रिल २०२३ रोजी गावातील जवळपास ३०० घराचा बौद्ध समाज गावचा त्याग करून आज गाव सोडून निघालेले आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post