पुणे (हवेली) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत मधील स्टार सिटी येथील समर्पण ओल्ड एज होम अॅण्ड रिहॅबिलेशन सेंटर येथे दिपावलीचे औचित्य साधून लक्ष्मी पुजनाच्या दिवशी संस्थेच्या वतीने दिपावली फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.
कार्यक्रमासाठी स्टार सिटी येथील सर्वसर्वा सुशील (महाराज) काळभोर, यांच्या उपस्थितीत व अशोक वक्ते, बचिन बोराटे, सागर जगदाळे, बांगर (पोलीस), सखाराम घाडगे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होत.
लक्ष्मण मासाळ यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या संमर्पण ओल्ड एज होम आता महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील ४२आजी-आजोबा यांची काळजी घेतली जाते. यांच्या दैनंदिन गरजा, देखभाल करण्यासाठी १६ कर्मचारी काम करत असतात. या उत्सवाच्या निमित्ताने स्टार सिटी मधील उपस्थित मान्यवर यांना फराळ देऊळ संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आहे.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन महेश खुळपे (शाहीर) यांनी केले. व आभार सोमनाथ पुणेकर यांनी मानले.



Post a Comment