सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (ता. हवेली) : हडपसर महाविद्यालयीन नवमतदारांना मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि २१३ हडपसर विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवमतदार नोंदणी अभियान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे, २१३ हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या सौ तेजस्विनी गदादे तसेच पर्यवेक्षक रसाळ, निलेश खलसे, रा से यो कार्यक्रम अधिकारी डॉ सविता कुलकर्णी, प्रा. नितीन लगड उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांनी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सौ तेजस्विनी रसाळ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया, त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे याची माहिती दिली. यावेळी ३५ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. या उपक्रमाचे नियोजन डॉ सविता कुलकर्णी, प्रा. नितीन लगड यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.


Post a Comment