सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : संविधान दिनानिमित्ताने थोडक्यात भारतीय संविधान या विषयावर संविधान जाणकार अनिल ए सुरडकर यांनी मत मांडले.
संविधान निर्माण होऊन जवळजवळ ७० ते ७२ वर्षे पूर्ण झाली. पण दुर्दैव असे की ज्यांच्यासाठी हे संविधान लिहिले त्या भारतीय नागरिकांना एक तर संविधानाचे पुस्तक कसे दिसते. पुस्तक कसे आहे. हेच माहीत नाही. ज्यांना पुस्तक माहित आहे त्यांनी वाचले नाही. ज्यांनी वाचले त्यांना समजले नाही. अशांची संख्या तुम्हाला आम्हाला भारतात बघायला मिळेल. आणि ज्यांना संविधान समजले त्यांना इतरांना शिकवता आले नाही. त्यामुळे भारत देशातील नागरिकांचे देशाचे अतोनात नुकसान झालेले आहे.
सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे "सविधान असे एक पुस्तक की बाळ आईच्या पोटातल्या गर्भापासून तर जन्मानंतर - मृत्यूपर्यंत आणि मृत्यूपासून पुढेही मनुष्याच्या जीवनात घटना घडत असतात. त्यांची नोंद घेण्यापासून तर तो मनुष्य सुखी जीवन कसा जगेल याचे उत्तम मार्गदर्शन करणारे पुस्तक होय. संविधान पुस्तक हे भारतासाठी नव्हे तर जगासाठी मार्गदर्शक आणि जगणे हे मान्य केलेले जगमान्य पुस्तक आहे.
पुस्तक तथागत भगवान बुद्धाचे तत्वज्ञान शिकविते हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळाच्या तरतुदी शिकविते. हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्रांतीचे विचार अंगिकाराला लावते. तर हे पुस्तक छत्रपती शाहू महाराजांचे आरक्षण देते.
देशातील ६ हजार ७४३ जातींना संरक्षण देणारे व सर्व धर्मांना धर्मग्रंथांना संरक्षण देणारे संविधान या पुस्तकाने माणसाचा मेंदू मजबूत झाला तर राज्यातील जनता गुलामगिरीतून मुक्त होणार आहे.
((संविधान म्हणजे))
संविधान देशाच्या राज्य कारभारासाठी तयार करण्यात आलेले मूलभूत कायदे ज्या ग्रंथात एकत्रित आहेत, त्यास 'संविधान' असे म्हणतात. संविधानास 'राज्यघटना' असेही म्हणतात. नागरिकांचे हक्क, शासनसंस्थेची रचना व अधिकार हे सर्व संविधानात नमूद केलेले असत.
संविधानाचे महत्त्व संविधानात नमूद केलेल्या तरतुदींनुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात. संविधानातील तरतुदींमुळे आपल्या लोकप्रतिनिधींना नियमांच्या चौकटीत राहून राज्यकारभार पाहता येती. त्यांच्याकडून अधिकाराचा दुरुपयोग होण्यास प्रतिबंध करता येतो. नागरिकांचे स्वातंत्र्य आणि हक्क सुरक्षित राहतात. नागरिकांना त्यांच्या हक्कांची हमी संविधानातील तरतुदींद्वारे दिली जाते.
संविधानामुळे शासनाचे अधिकार व त्यावरील मर्यादा स्पष्ट होतात. स्वातंत्र्य सुरक्षित राहते. जनतेचा राज्यकारभारातील सहभाग वाढतो, हणून संविधानानुसार राज्यकारभार केल्यास लोकशाही बळकट होते.

Post a Comment