शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

कदमाकवस्ती ग्रामपंचायतीच्या चाव्या कोणाकडे जाणार : २० डिसेंबरला ठरणार किंगमेकर___


 


सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज

पुणे (ता. हवेली) : पुणे - सोलापुर महामार्गावरील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत तशी आर्थिकदृष्ट्या संपन्न समजल्या जाणाऱ्या या ग्रामपंचियतीकडे पाहिले जाते. 

          या पुर्व हवेली मधील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रत्यक्ष रणधुमाळीस (२८ नोव्हेंबर) पासून सुरुवात होत आहे.

          निवडणुकीसाठी सोमवार २८ नोव्हेंबर ते शुक्रवार २ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. 

          पूर्व हवेलीतील कदमवाकवस्तीचे “सरपंच पद यंदा “इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव” आहे.

        मागील पंचवार्षिक निवडणुकी प्रमाणे यंदाही सरपंच हा थेट जनतेतुन निवडला जाणार आहे. “सरपंच” पद यंदा “इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव” असले तरी, सरपंचपदाचे उमेदवार हे माजी सरपंच नंदू काळभोर व विद्यमान सरपंच गौरी गायकवाड यांच्या मर्जीतील असणार हे नक्की. असल्याचे संकेत मिळत आहेत. 

            या संकेतानुसार ही निवडणुकही मागील निवडणुकीप्रमाणेच चर्चेत राहणार, हे नक्की झाले आहे. कदमवाकवस्तीच्या विद्यमान सरपंच गौरी गायकवाड व भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष व नवपरिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी मागील पाच वर्षात कदमवाकवस्ती ग्रामपंचायत मध्ये केलेल्या विकासाच्या / कामाच्या जीवावर पुन्हा एकदा ग्रामपंचायतीची सत्ता मिळवण्यासाठी विद्यमान सरपंच व युवा नेते ओमराजे गायकवाड यांनी फिल्डिंग लावली आहे. मागील काही महिन्या पासूनच प्रत्येक वार्डात नागरिकांच्या भेटीगाठी घेत असून केलेल्या विकासाची माहिती देत आहेत. 



       कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच गौरी गायकवाड व चित्तरंजन गायकवाड यांच्या पॅनेलला शह देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदु काळभोर, व विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर यांनी सरपंच पदासाठी त्यांची पत्नी कल्पना काळभोर यांची उमेदवारी जाहीर करुन निवडणुकीच्या आखाड्यात आघाडी घेतल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीत एकुन १७ सदस्य असुन, यावेळेस गावाचा गाडा चालवण्यासाठी जनता जनार्दन कोणाला कौल देतात हे बघणे उस्तुकतेचे ठरणार आहे.

         पाच वर्षापुर्वी गौरी गायकवाड या थेट जनतेतुन मोठ्या मताधिक्क्याने सरपंच म्हणुन निवडुन आल्या होत्या. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीत लाईट, रोड या सारख्या मुलभूत गरजांचा विकास केला याच दरम्यान मागील पाच वर्षाच्या काळात ९० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेसह अनेक कोटींची कामे मार्गी लागलेली आहेत. 



          या विकासाच्या जोरावर सरपंच गौरी गायकवाड व चित्तरंजन गायकवाड यांनी सलग दुसऱ्यांदा ग्रामपंचायतीची सत्ता राखण्यासाठी पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. 

           विद्यमान सरपंच गौरी गायकवाड व चित्तरंजण गायकवाड यांच्या गटातुन सत्ता हिसकावून घेण्यासाठी माजी सरपंच नंदु काळभोर, व मागील काळातील नाराज असलेल्या सदस्य यांची मोट बांधण्यात माजी सरपंच नंदू काळभोर व इतर इच्छूक यशस्वी होणार का हा येणारा काळच ठरवले. 



निवडणुक कार्यक्रम पुढीलप्रमाणे


१) उमेदवारी अर्ज स्विकारण्याची तारीख सोमवार २८ नोव्हेंबर ते शुक्रवार २ डिसेंबर_


२) अर्जाची छाननी - सोमवार ५ डिसेंबर_


३) अर्ज मागे घेण्याचा अंतीम दिवस- बुधवार ७ डिसेंबर_


४) चिन्ह वाटप - बुधवार ७ डिसेंबर_


५) मतदान - रविवार १८ डिसेंबर_


६) मतमोजनी - मंगळवार २० डिसेंबर_


या सर्व घडामोडी नंतर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या चाव्या कोणाकडे जातात ते बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post