प्रतिनिधी धनंजय काळे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : आज (मंगळवार, ०८ नोव्हेंबर) रोजी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण भारतासह अनेक देशांमध्ये दिसणार आहे. सकाळी ८.२० मिनिटांनी ग्रहणाचे सुतक सुरू होईल. या काळात धार्मिक किंवा शुभ कार्य केले जाणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणकाळात आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी या काळात काही विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रग्रहणाच्या सूतककाळात कोणतेही शुभ कार्य करू नये. सूतक काळात देवाचा पूजा-पाठ तसेच धार्मिक कार्ये वर्जित असते. सूतककाळात खाण्या-पिण्याच्या पदार्थांवर तुळशीपत्र ठेवावे. तसेच इष्ट देवी-देवतांचे नामस्मरण करावे. भारतामधील चंद्रग्रहणाची सर्वसाधारण वेळ ही संध्याकाळी ५ वाजून ३२ मिनिटं ते ७ वाजून २७ मिनिटं इतकी आहे. संध्याकाळी ६ वाजून १९ मिनिटांपर्यंत ग्रहणाचे वेध पाळले जातील. लहान मुलं, आजारी व्यक्ती, अशक्त व्यक्ती, गरोदर स्त्रिया यांच्याकरिता वेध पाळण्याचा कालावधी सकाळी ११ वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहेत. ग्रहण ही सामान्य खगोलीय घटना असली तरीही शास्त्रानुसार ग्रहणाच्या वेळेस काही नियम पाळण्याची रीत आहे.


Post a Comment