.
शुभांगी वाघमारे
महाराष्ट्र पोलिस न्यूज
मुंबई : मुंबईवर २६/११ ला झालेला दहशतवादी हल्ला अजूनही थरकाप उडवणारा अनुभव ठरतो आहे. या हल्यात सुमारे १७० लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात सामील असलेल्या अजमल कसाब याला २०१२ मध्ये अचानक फाशी दिल्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा सर्वांसाठी धक्कादायक ठरली होती. वास्तविक कसाबला स्वतःलाही याची कल्पना नव्हती की त्याला फाशी दिली जाणार आहे. त्याला खोटे सांगून मुंबईच्या आर्थर रोड जेलमधून बाहेर काढण्यात आले होते. पुण्याच्या येरवडा जेलमध्ये गुप्तपणे त्याला फाशी देण्यात आली होती.
या सिक्रेट ऑपरेशनचे प्रमुख पोलिस अधिकारी प्रवीणकुमार पाटील यांनी तब्बल १४ वर्षांनी हे गुपित उघड केले आहे. त्यांचा हा अनुभव सांगताना पाटील म्हणाले, " या हल्ल्यात एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी अजमल कसाब याला ४ वर्षांनंतर फासावर लटकावण्यात आले. त्यासाठी राबविलेले ऑपरेशन- एक्स अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले होते. फाशीच्या २७ तासांआधी त्याला ऑर्थररोड जेलमधून काढले. मध्यरात्री १ वाजता पोलिस फोर्स १५० किमीवर असलेल्या येरवडा कारागृहाच्या दिशेने निघाला. वाहनात बसलेला कसाब अन् सुरक्षा पुरविणारी यंत्रणा फाशीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होती."
पाटील म्हणाले, कोर्टाचा निकाल व दया याचिका " फेटाळल्यामुळे अतिरेकी मोहंमद अजमल अमीर कसाबची फाशी निश्चित झाली. मुंबई पोलिसांना कसाब याला फाशीसाठी मध्यवर्ती येरवडा कारागृहात तातडीने हलविण्याचा गोपनीय आदेश मिळाला होता. तत्कालीन सहपोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी ऑपरेशन एक्ससाठी माझ्यावर जबाबदारी सोपविली. तेव्हा मी परिमंडळ १२ चा उपायुक्त होतो." निर्णय झाल्यानंतर आम्ही अत्यंत सूक्ष्म नियोजन केले होते. "कसाबला तुझी प्रकृती खराब असल्यामुळे वैद्यकीय चाचणी करण्यासाठी नेत आहोत", असे कारण सांगण्यात आले होते. तपास अधिकारी रमेश महाले यांनी संपूर्ण रस्त्यात कसाबला बोलण्यात गुंतवून ठेवलेले होते.
आदेशाप्रमाणे मध्यरात्री १ वाजता कसाबला घेऊन फोर्स - १ कमांडोंचा ताफा पुण्याकडे रवाना झाला. साधा वेष अन दिवे नसलेल्या तीन स्कॉर्पिओचा ताफा मुंबई-पुणे महामार्गावर होता. ताफ्याच्या दोन किमी मागे व पुढे एसआरपीची दोन प्लॅटून ठेवण्यात आल्या होत्या. शस्त्र व दारुगोळांनी युक्त कमांडो, एसआरपी जवानांनाही वाहनात कसाब असल्याचे अन् वाहन कुठे जात असल्याची माहिती नव्हती, असे पाटील यांनी सांगितले. ताब्यात दण्यात आल. त्यानंतर २४ तासानी म्हणजे दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर २०१२ रोजी अजमल याला फासावर चढवण्यात आले.”
या ऑपरेशन साठी सहा पासवर्ड ठरले होते. त्यापैकी 'स्टार्टेड टू अल्फा' अर्थात ऑर्थररोड कारागृहातून रवाना हा पहिला पासवर्ड होता. येरवडाला पोहचल्यावर शेवटचा पासवर्ड 'रिच फॉर फॉक्स' हा अधिकारी दाते यांना पाठविण्यात आला, असे पाटील म्हणाले. पाटील म्हणाले, " त्या दिवशी रात्री ८ वाजता अधिकाऱ्यांनी मला बोलावले. 'बॅगा तयार ठेवा, दोन तासांत बोलवतो, घरीही सांगू नका,' अशी सूचना केली होती.
प्रवासात अजमल कसाब शांत होता. येरवडा कारागृहात आल्यानंतरही कमांडो ताफा अनभिज्ञ होता. प्रवासामुळे त्यांना विश्रांतीची सूचना केली गेली. तत्पूर्वी सर्वांचे मोबाइल एकत्र जमा करण्यात आले. कोणीही बाहेर पडायचे नाही, असा आदेश झाला. कसाबच्या फाशीनंतर ताफ्यातील कर्मचाऱ्यांना वाहनात कसाब होता याची माहिती झाली.”

Post a Comment