प्रतिनिधी (श्री सुनिल थोरात)
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व उद्यान गेले अनेक महिने बंद अवस्थेत होते. दोन दिवसापूर्वी मा.उपमहापौर परशुराम वाडेकर, व सुनिता परशुराम वाडेकर यांनी कुलगुरू साहेबांना विनंती केली. की उद्यान नागरिकांसाठी खुले करावे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नागरिकांना दर्शन घेता यावे. पुतळा हा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे उद्यान खुले करावे अशी विनंती केली.
अन्यथा उद्यान नागरिकांसाठी खुले न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला असता कुलगुरू यांनी त्वरित आमची व नागरिकांची विनंती लक्षात घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले. आज सकाळी पहाटे परशुराम वाडेकर सुनिता वाडेकर व नागरिकांनी माॅर्नीग वॉकिंगचा आनंद घेतला व उद्यानातील डॉ बाबासाहेबांना अभिवादन केले. तसेच कुलगुरू, विद्यापीठ प्रशासनाचे धन्यवाद व आभार परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी वाकिंग ग्रुपचे सर्व माझे मित्र मा. शाबुद्दीन काजी, सतीश गायकवाड, व अनेक मित्र उपस्थित होते.


Post a Comment