सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (ता. हवेली) : शिवसेना युवासेना मांजरी च्या वतीने ५०% सवलतीच्या दरात गिरण & L.E.D Tv चे वाटप करण्यात आले.
शिवसेना मांजरी प्रभाग प्रमुख स्वप्निल राजेंद्र वसवे व युवासेना प्रभाग अधिकारी हडपसर विधानसभा किरण प्रताप जाधव यांच्या तर्फे ५० % सवलतीच्या दरात दिवाळी निमित्त एक महिन्याच्या ऑफर च्या कालावधी मधील २१ गिरण्यांचे वाटप आणि ५ led tv चे वाटप घुलेवस्ती मांजरी इथे करण्यात आले. या प्रसंगी शाखाप्रमुख बाळासाहेब खरोसे, युवासेना उपविभाग अधिकारी महेश घुले, उपशाखाप्रमुख गिरीश कानकाटे उपस्तिथ होते. या उपक्रमामुळे मांजरी परिसरात स्वप्निल यांचे कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे नियोजन शिवसेना प्रभाग प्रमुख मांजरी स्वप्निल राजेंद्र वसवे यांनी केले होते.

Post a Comment